उमरखेड पोलिसांनी खूनाचा गुन्हा उघडकीस आणला ; दोन्ही आरोपी गजाआड
उमरखेड पोलिसांनी खूनाचा गुन्हा उघडकीस आणला ; दोन्ही आरोपी गजाआड
उमरखेड – (प्रतिनिधी)
१५ ऑक्टोंबर रोजी पैनगंगा नदीपात्रात मिळालेल्या एक अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या उघडकीस आणला आहे. मृतकाचा गळा दाबून आणि डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान, दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सांयकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, मौजे तिवडी गावच्या हद्दीतील पैनगंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात एक अनोळखी मृतदेह सापडला. मयताच्या हातांची रंगीबेरंगी शेल्याने बांधलेल्या स्थितीमुळे, पोलीस स्टेशन उमरखेडने मर्ग क्रमांक 62/2025 चा गुन्हा नोंदवला. तपासाच्या सुरुवातीला, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी मृतकाची ओळख लावण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ दिवसांपासून विविध पोलीस स्टेशन्समध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोध घेतला. त्या दरम्यान, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पोलीस स्टेशनकडून मानव मिसिंग संबंधित माहिती मिळवली आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यामुळे, १ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या मिसिंग व्यक्तीच्या तक्रारीला संबंधित मृतकाच्या वर्णनाशी मिळतीजुळती माहिती मिळाली. मृतकाची ओळख मारोती गुणाजी सोनकर (वय 50 वर्षे), कळगाव ता उमरी जि नांदेड अशी पटली.
त्यानंतर, मृतकाच्या कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केल्यानंतर, त्याचा भाऊ गणेश सोनकर आणि भाचा अमोल श्रीमंगले यांच्यावर संशय निर्माण झाला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्या समोर तपासात माहिती घेतली. त्यांनी कबूल केले की, मृतक नेहमीच घरातील सदस्यांना त्रास देत होता आणि त्याच्यामुळे सर्व कुटुंब मानसिकदृष्ट्या वेढले होते. या तणावामुळे, १४ ऑक्टोंबर रोजी, दोन्ही आरोपींनी मृतकाला दारुच्या नशेत असताना मोटारसायकलवरून एका निर्जन स्थळी नेऊन, त्याचा गळा दाबून आणि डोक्यात मारहाण करून त्याची हत्या केली. नंतर, मृतकाचे हात बांधून, त्याला पैनगंगा नदीत फेकले.
पोलीस स्टेशन उमरखेड ने मर्ग गुन्हा प्रकरण क्र. 685/2025 दाखल केला असून, आरोपी गणेश गुणाजी सोनकर (वय 31 ) वर्ष, कळगांव, उमरी) आणि अमोल किसनराव श्रीमंगले (वय 25) वर्ष, कोळगांव, उमरी यांना अटक करण्यात आली आहे.
तपास कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
———




There is noticeably a bundle to find out about this. I assume you made certain good factors in features also.
Very useful, thank you.
I got good info from your blog
It?¦s really a great and useful piece of information. I?¦m satisfied that you simply shared this helpful information with us. Please keep us informed like this. Thank you for sharing.
is it safe to travel to turkey because of ukraine Dylan K. Ephesus is a must-see. The library ruins are breathtaking in person. https://tour.concejomunicipaldechinu.gov.co/en/bodrum-private-boat-tour.html
israel tours 2025 from south africa Jacob W. Hot air ballooning should be on everyone’s bucket list. https://gmonterrey.com/antalyas-coastal-stories-history-and-sea-with-turkey-tour-packages/