बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांचा हिंगोली लोकसभा संघातून उमेदवारी अर्ज दाखल.
बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांचा हिंगोली लोकसभा संघातून उमेदवारी अर्ज दाखल
उमरखेड ;
हिंगोली लोकसभा मतदार संघ अंतर्गत हदगाव हिमायतनगर , उमरखेड महागाव वसमत हिंगोली कळमनुरी व किनवट या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दिनांक 3 एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे भाजपा पक्षाने शिवसेना शिंदे गटाला ही जागा पक्षश्रेष्ठींनी सोडली असता भाजपा मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक योगी शाम भारती यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या वागणुकी विरोधात जाऊन पक्षाचा आदेश झुगारत आपली उमेदवारी अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे भाजपातील कार्यकर्ते पक्ष ही बाजूला सारून आपापल्या उमेदवारी दाखल करीत असल्याने भाजपा सेना युतीला ही निवडणूक जड जाण्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . नागेश पाटील आष्टीकर यांच्या समवेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी पापडकर यांच्या कक्षात पक्षाचे एबी फॉर्म लावत उमेदवारी दाखल केली आणि हिंगोली शहरातील गांधी चौकात सभा घेऊन पक्षाची धारा अंबादास दानवे यांनी मांडून भाजपा सेना युतीवर व त्यांच्या कार्यप्रणालीवर कडाडून टीकास्त्र डागले आणि हे सरकार शेतकरी विरोधी असून कोणत्याही पद्धतीचे शेतकरी उन्नतीचे कार्य न करता उद्योजकांच्या पाठीशी राहून अनेक जणांना देशोधडीला आकार लावत असल्याचे यावेळी दानवे यांनी सांगून भाजपा शिंदे शिवसेना गटाला आपली जागा दाखवा असे आव्हान यावेळी उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांना केले.