त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचार विरोधात धरणे आंदोलन.

youtube

त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचारा विरोधात धरणे आदोलन

कुल जमाअती मुत्तहिदा महाज यांच्या वतीने राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन ⊆

उमरखेड….

त्रिपुरा राज्यात सतत सात ते आठ दिवसापासून मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचार आणि इस्लामच्या आखरी प्रेरित मोहम्मद(सल) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्यात आलेल्या अशा दोषींना पोलीस विभागांनी हिंसा व अत्याचार थांबवण्यासाठी कारवाई करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे .पोलिस यंत्रणा ही स्वतंत्र संस्था आहे,नाही कुणाची राजनैतिक दल किंवा पक्ष वाढवण्यासाठी नाही.कुल जमाअती मुत्तहीदा महाज यांच्या म्हणण्या नुसार पोलीस आणि प्रशासन हे राज्य सरकारच्या अधीन आहेत.
त्रिपुरा मध्ये झालेल्या हिंसा व अत्याचाराला जिम्मेदार आहेत .राज्य सरकारने आतापर्यंत हिंसा पसरवणाऱ्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई सुरू केली नाही ही अत्यंत निंदनीय बाब आहे.आम्ही सन्माननीय राष्ट्रपती यांना मागणी करतो पीडितांना न्याय व झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यात मशीद तोढल्या गेल्या त्याची नुकसान भरपाई करण्यात यावी.
सरकारला पनीसागर मध्ये झालेल्या हिंसाचार विरुद्ध ज्यांनी कटकारस्थान रचलेल्या अशा दोषींविरुद्ध ओळख करून त्यांना जेरबंद केले पाहिजे .तसेच पोलिसांकडे सर्व घटनेचे फुटेज आहेत व त्यांनी दोषीं विरुद्ध चौकशी करून कारवाई करण्यात यावी .त्रिपुरा मध्ये झालेल्या हिंसाचार विरुद्ध आपल्या देशाची प्रतिमा खराब झाल्याचे दिसत आहे व त्रिपुरा सरकार अल्पसंख्यांक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना सुरक्षित ठेवल्या मध्ये अक्षम आहे . असेही सांगण्यात आले .त्रिपुरा मध्ये घडलेल्या हिंसाचार हे सर्व पुर्वनियोजित आहे लोकांना भडकवण्यात आले आणि मुस्लिम बांधवांच्या विरोधात व एका समुदायाच्या विरोधात भडकून प्रोत्साहन देण्याचा काम तेथील सरकारने केले आहे .
त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचार व अन्याय अत्याचार व तोडफोड अशी घटना घडणे म्हणजे त्रिपुरा सरकार साठी लाजिरवाणी बाब आहे.आणि हे हिंसाचार थांबवणे फार गरजेचे आहे सोशल मीडिया वरती फेक न्यूज पसरवून दोन गटांमध्ये विरोध दर्शवण्याचे काम तेथील काही समाजकंटकांनी केले आहे . हे कटकारस्थान थांबवण्याचे काम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले पाहिजे व त्वरित त्रिपुरामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून दोषी वरती कारवाई केली पाहिजे.
करिता उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यासाठी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

 

Google Ad
Google Ad

3 thoughts on “त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचार विरोधात धरणे आंदोलन.

  1. I am currently writing a paper and a bug appeared in the paper. I found what I wanted from your article. Thank you very much. Your article gave me a lot of inspiration. But hope you can explain your point in more detail because I have some questions, thank you. 20bet

  2. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!