उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायत चा निकाल जाहीर पोलीस अधिकाऱ्यांनी बजावली चोख कामगिरी.

उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
पोलीस आधी काऱ्यांनी बजावली चोख कामगीरी
उमरखेड
उमरखेड तालुक्यातील 10 बिनारोध निवड तर आज 75 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकाल नुकताच लागला असून विजयी उमेदवारांनी अतिशय जल्लोषात गुलाल उधळून स्वागत केले आहे यावेळी उमरखेड प्रांगणात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली तर सायंकाळी सहा परयत संपले मतमोजणी .व निकाल जाहीर झाले. त्यामध्ये पोलिस बंदोबस्त चोखपणे काम करीत असताना दिसून आले. निवडून आलेले उमेदवार अतिशय जल्लोष मध्ये आनंद व्यक्त करत होते. यावेळी कुठल्याही प्रकारचे ढोल-ताशे किंवा फटाक्यांची आतिषबाजी न करता शांतते मध्ये उमेदवाराने आपले स्वतःच्या आनंदात जल्लोष व्यक्त केला तसेच निवडणूक अधिकारी आनंद देऊळगावकर ,डॉ. व्यंकट राठोड निवडणूक निरिक्षक उ. पुसद, गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे मतमोजनी निवडणूक प्रक्रिया चे कामकाज पाहिले. तसेच उमरखेड चे ठाणेदार चोबे. एपीआय गाडे ,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश खेडेकर, ,पि.एसआय पांचाळ, पीएसआय जायभाई व पोलीस कर्मचारी स्टॉप ,स्ट्रॉंग गारड चे घाटोळे तसेच गोपनीय शाखांमधील सुलोचना राठोड महिला पोलिस कर्मचारी, राज्य राखीव बल गट क्रमांक 14 औरंगाबादचे हरीश थोरात, शिवराज सोमनाथ झोरी जावेद शेख, नितीन गायिकी ,संजय सुलाने ,विशाल सोनटक्के यांनी अतिशय तटस्थपणे पोलिस बंदोबस्त ठेवला. कडकडीत बंदोबस्त मुळे सर्व शांततेत व सुरळीतपणे पार पडले.प्रशासन ला सहकार्य केले.