दगडाने ठेचुन 20वर्षीय युवकाचा खुन -उमरखेड
दगडाने ठेचून 20 वर्षीय युवकाचा खून
*उमरखेड तुळजापूर महामार्गावरील घटना-परिसरात खळबळ*
उमरखेड(शहर प्रतिनिधी)
दि.30जुलै
सविता चंद्रे
उमरखेड तुळजापूर महामार्गावरील, मार्लेगाव येथील पैनगंगा नदीच्या परिसरात, कार्तिक ट्रेडिंग कंपनी जवळ 22 वर्षीय असलेल्या एका युवकांचा नाव अक्षय वसंतराव करे रा. पाटील नगर युवकाचा मृत्यू आढळून आला असून.
सदर हे खून की आत्महत्या त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दगडाने ठेचून मारल्याच्या जखमा पोलीस तपासामध्ये आढळून आल्या, व अक्षय याचा खून झाला असल्याचे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, आज सकाळी 10 च्या सुमारास, उमरखेड वरून 3 ते 4 की.मी.अंतरावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह आढळून आला.
लगेच ही माहिती उमरखेड पोलिसांना देण्यात आली,घटनास्थळी उमरखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, ठाणेदार वागतकर, सहायक निरीक्षक संदीप गाडे,
यांची टीम तात्काळ दाखल झाली त्या वेळी सदर युवकाच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना आढळून आले, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून, मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालया उमरखेड येथे हलविण्यात आले,या घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनाखाली, ठाणेदार वागतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे हे करीत आहे.