शस्त्र घेवुन उमरखेड शहरात दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या इसमावर उमरखेड पोलीसांची कारवाई। दहशत निर्माण करणा-या रील समाजमाध्यमावर प्रसारीत न करण्याचे आवाहन

youtube

शस्त्र घेवुन उमरखेड शहरात दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या इसमावर उमरखेड पोलीसांची कारवाई 

दहशत निर्माण करणा-या रील समाजमाध्यमावर
प्रसारीत न करण्याचे आवाहन 

 

उमरखेड –

समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रकारच्या रील बनवुन भाईगीरी करणा-पोचे मोठया प्रमाणात तरुणाईमध्ये फॅड निर्माण झाले आहे. पोलीस दल अशाप्रकारे भाईगीरी करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांच्या कृत्यावर लक्ष ठेवुन असतात. दि.३०/०९/२०२४ रोजी सपोनि भगत यांना पो.स्टे.ला हजर असताना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सोशल मिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत असुन त्यामध्ये एक ईसम हातात एक धारदार चाकु घेऊन रिल्स बनवुन ईन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. व सदर इसम हा घारदार चाकु गुन्हेगारी कृत्य करझयाच्या दृष्टीने सतत सोबत बाळगुन असतो. अशा खात्रीशीर माहीतीवरून, सदर इसम शेख गौस शेख करीम वय-२५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ हा निष्पन्न करण्यात आला. व तो उमरखेड शहरात हजर असल्याचे समजले. यावरून सपोनि कैलास भगत सोबत परि. पोउपनि सागर इंगळे, पोकों १६५२ टेंबरे तसेच सोबत दोन पंच सह कार्यवाहीकामी उमरखेड शहर येथे रवाना झाले. मिळालेल्या माहीतीप्रमाणे तो मीळुन आला. त्याबी ओळख पटवुन त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव रोख गौस शेख करीम वय-२५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ असे सांगितले पंचामक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ एक चाकु लाल काळया रंगाची लाकडी मुठ असलेला ज्याची लांबी टोकापसुन मुठीपर्यंत पात्याची लांबी चार ईंच व मुठीची लांबी पाच इंच पात्याची मध्यभागी रुंदी एक ईंच बटण दाबल्यावर चालु बंद होणारा जुना वापरता चाकु किंमत अंदाजे २५०/रुपये तसेच एक ओप्पो कंपनीचा आकाशी रंगाचा जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे ८००० रुपये मिळुन आले. त्याचे ईन्स्टाग्राम आय डी armansheikh_sheikh_7_7_7 ओपन करून अकाउंट चेक केले असता त्यावर बरेव व्हिाडीओ असुन त्यापैकी एका व्हिडीओमध्ये “चाकु और चाकु का निशाण ये तुझे हम बतायेंगे जिस दिन बी तेरा नाम और पता चल जायेंगा ना मुखबीर ऊस दिन तैय ३०७ बनायेंगे उमरखेड शहरमें” अशा वर्णनाची रिल्स मिळुन आले. त्याने मा. जिल्हाधिकारी सा. यवतमाळ यांचे आदेश क. गृहशाखा/डेस्क १२/कावि/२०४०/२०२४ दि.२०/०९/२०२४ लागु असताना दहशत पसरवण्याच्या ऊद्‌देशाने सदर आदेशाचे उल्लंपण केल्याने सदर इसमावर अप क ६५९/२०२४ कलम ३७(२), (३),१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबात पुढील तपास बीट जमादार पोहवा राजुसिंग पवार ब.न. १६८ पो स्टे उमरखेड
सदरची कारवाई मा.श्री.कुमार चिंता पोलीस अधीक्षक साहेब, यवतमाळ, मा. पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.उप. विभागीय अधिकारी गायकवाड साहेब, प्रभारी अधिकारी सपोनि कैलास भगत, यांचे मार्गदर्शनात परि. पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, यांनी केली आहे. तरुणांनी
तरुणांनी गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणारे भाईगीरी करणारे व हातात घातक शव पेवुन समाजात भीती निर्माण करणारे रील्स बनवुन समाजमाध्यमावर प्रसारीत करुन, समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन पोलीसात‌र्फे करण्यात येत आहे. याये उल्लघन करणा-यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “शस्त्र घेवुन उमरखेड शहरात दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या इसमावर उमरखेड पोलीसांची कारवाई। दहशत निर्माण करणा-या रील समाजमाध्यमावर प्रसारीत न करण्याचे आवाहन

  1. pragmatic play pragmatic play pragmatic play
    I do consider all the concepts you’ve introduced for your post.
    They’re very convincing and can certainly work.
    Nonetheless, the posts are very brief for starters.
    May you please lengthen them a little from subsequent time?
    Thank you for the post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!