महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कामात उमरखेड तालुका ठरतोय अग्रेसर गटविकास अधिकारी वानखेडेच्या पुढाकाराने साक्षात्कार.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कामात उमरखेड तालुका ठरतोय अग्रेसर !
गट विकास अधिकारी वानखेडे च्या पुढाकाराचा साक्षात्कार.
उमरखेड:— तालुक्यात मागील २०२१-२२ यावर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख ४१ हजार २१६ मननुष्यदिन रोजगार निर्मीती करून एक नवा विक्रम केला आहे. वैयक्तिक सिंचन विहिरी गुरांचे गोठे वृक्ष लागवड गावांतर्गत कच्च्या नाल्यांची बांधणी अशी विविध कामे या योजनेअंतर्गत पूर्णत्वास येऊन तालुक्यातील ग्रामीण भागात यंदा उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोजगारा अभावी होणारे मजुरांचे स्थलांतर, तसेच पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यात मोठा हातभार लावला आहे. यासाठी येथील गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे याबाबी शक्य झाल्या आहेत
माहत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यान्वित आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर ,अल्पभूधारक व भूमीहीनाच्या उत्थानासाठी अनेक योजना राबविन्यात येतात.त्याचबरोबर नव्याने राज्यातील महा विकास आघाडी सरकारने मातोश्री पांदण रस्ते ही योजना यात अंतर्भूत केल्याने ग्रामीण विकासाच्या वाटा ही खुल्या झाल्या.अत्यंत पारदर्शक व कुठल्याही गैरव्यवहार व भ्रष्टाचाराला थारा नसेल या योजनेमध्ये संधीसाधू अधिकाऱ्यांना लाभ ?मिळत नसल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात ही योजना मागे पडली असताना येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांनी मात्र आपल्या कल्पक विचारसरणीतून ग्राम विकासा सोबत ग्रामीण जनतेच्या वैयक्तिक हिताची अनेक विकास कामे प्रत्यक्षात अमलात आणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उमरखेड तालुक्यात अव्वलस्थानावर नेण्याचे काम सुरू केले आहे . महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम विकासाच्या मुख्यदुवा असलेल्या ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सध्या तालुक्यातील 92 ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेकडो वैयक्तिक सिंचन विहिरी सह गुरांचे गोठे शेततळे तुती लावगड मोहगनी वृक्ष लावगड , बिहार पॅटर्न वृक्ष लागवड,तुती लावगड,रोपवाटीका निर्मीती, यासह अनेक वैयक्तिक लाभाच्या कामे सुरू करण्यावर भर दिल्या जात आहे ग्रामीण भागातील जनतेचे यातून जीवनमान उंचावेल ही भावना दृष्टिश्रेपात ठेवून ही भावना बाळगून गट विकास अधिकारी वानखेडे यांनी केलेल्या प्रशासकीय कर्तव्यपुर्तीचे ग्रामीण जनतेच स्वागत होत आहे.
चौकटः
{महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी साठी तीन लाख २७ हजार ७७० रुपये एवढे अनुदान देण्यात येते. तर गुरांच्या गोठ्यात साठी ७७ हजार रुपये देण्यात येतात. वृक्ष लागवडीसाठी तीस हजार रुपये, तर कच्ची नाली बांधकामासाठी ५० हजार रुपये देण्यात येतात. ही सर्व कामे मजुरांकडून करून घ्यावयाची असून त्यासाठी प्रत्येक मजुराला २५६ रुपये प्रति दिवस मजुरी देण्यात येते. यासाठी मजूर म्हणून नोंदणी आवश्यक असून, त्याच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड आवश्यक आहे.}
चौकटः { मातोश्री पांदन रस्त्यासाठी पुढाकार हवा ! मातोश्री मीनाताई ठाकरे पांदणरस्ते विकास ही योजना ग्रामीण भागातील आडवळण्यातील शेत शिवारामध्ये जाणार्या रस्त्यांचे निर्मितीमुळे, शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत तालुक्यात ही योजना प्रभावी पणे राबविल्यास गेल्यास उमरखेड तालुक्यात ग्रामीण विकासाची नवक्रांती होणार आहे. यासाठी महसूल प्रशासना सह पंचायत समिती प्रशासनाने येत्या काळात प्रभावीपणे कार्य केल्यास ग्रामीण भागात विकासाची पहाट उगवेल यात शंका नाही अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे} .
वैयक्तिक सिंचन विहिरी व शेततळे या कामाने गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या कामाचा आढावा घेतल्यास तालुक्यात येत्या काळात किमान पाचशे हेक्टर नव्याने बारमाही सिंचनक्षेत्र निर्माण होईल. ह्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतीतून उत्पन्नाचे नवनवे श्रोत निर्माण होऊन त्याच्या विकासाचा नव्या वाटा निर्माण होतील.
{प्रवीणकुमार वानखेडे. गटविकास अधिकारी. पंचायत समिती, उमरखेड}
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.