वाघदरा तलावात बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू ( मेट शिवारातील घटना , गावकऱ्यात हळहळ )

youtube

वाघदरा तलावात बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू

( मेट शिवारातील घटना , गावकऱ्यात हळहळ )

उमरखेड :- बैलगाडी घेऊन तलावा लगत असलेल्या शेतात जात असताना बैलगाडी समोर आलेल्या रानडुकरामुळे बैलांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बैलगाडी सरळ तलावात घुसली व त्यामध्ये गाडी अंगावर पडल्याने तलावात बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 21 रोजी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान मेट येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघदरा तलावात घडली . तलावातून बैल बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले तरअचानक झालेल्या बापलेकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .
अमोल देविदास चव्हाण 35 व वीरू अमोल चव्हाण वय 11 रा . मेट असे या घटनेत मृत झालेल्या बाप लेकाचे नाव असून अमोल चव्हाण यांचे शेत तळ्यालगत असल्यानेशेतात काम करण्यासाठी दोन्ही बापलेक बैलगाडीवर चालले असताना बैलगाडीच्या समोर अचानक रान डुक्कर आल्याने बैल गाडीसह पळत सुटले व सरळ गाडी तलावात घुसली त्यामुळे तलावा दोघे बापलेक बुडाले व त्यांच्या अंगावर गाडी पडल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला .सदर घटना तलावाजवळील माळरानावर जनावर चालत असलेल्या युवराज उत्तम राठोड यांनी पाहिल्यावर त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्या ठिकाणी दिलीप भाऊराव जाधव सुभाष वसराम चव्हाण संतोष मसराम चव्हाण व रोहिदास कमल राठोड हे शिवारातील व्यक्ती धावून आले व त्यांनी तलावात जाऊन दोघांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत बापलेकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता .सदर घटनेची माहिती माजी जि प सदस्य उत्तमराव राठोड यांनी पोलीस स्टेशन व तलाठी यांना कळवल्यानंतर बिटरगाव पोस्टचे ठाणेदार प्रेम कुमार केदार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले .
या अचानक घडलेल्या घटनेमुळे मेट गावात व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात होती .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!