अत्याचार व अन्यायाविरुद्ध एकजुट व्हा -सचिन साठे.
अत्याचार व अन्यायाविरूद्ध एकजुट व्हा- सचिन साठे
हदगाव ..
मातंग समाजाने राजकीय क्षेत्रा मध्ये स्वभिमानी रहावे राज्यात मातंग समाजावर अन्ययाची परिसीमा वाढत असून समाजाने स्वभिमानी राहुन अन्यायचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज रहावे असे आव्हान केले
दि 9 डीसेम्बर रोजी बिलोली येथील मुखबधिर एका 27 वर्षीय तरुण मुलीवर बलात्कार करून दगड़ाने ठेचुन खून केला होता या ठिकाणी सचिन भाऊ साठे यांनी पीड़ित कुटुंबाची भेट घेऊन मुख्य आरोपिला अटक करून दिशा या नवीन कायद्याच्या अंतर्गत फाशी ची मागणी केली व राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधुन पीड़ित कुटुंबाला समाजकल्याण विभाग कडून आर्थिक मदत व त्यांचे पुनर्वशन करण्यात यावे अशी मागणी केली आणि ती मागणी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले अधिकारी घटना स्थळी पाठवून मदत करणार असल्याचे संगीतले
या भेटि दरम्यान मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय सचिव गणेश भगत,कोर कमिटी अध्य्क्ष टी.एन. कांबळे, प्रदेश अध्यक्ष आर. बी.साठे, मराठवाड़ा सचिव बाळासाहेब खानजोडे ,बिड जिल्हा अध्य्क्ष रणजीत जोगदंड, के,वाय. देवकांबळे, जिल्हा अध्यक्ष,जिल्हा संपर्क प्रमुख किशन इंगले,महानगर अध्यक्ष प्रवीण बस्वंते , जयराम वाघमारे,यांनी बिलोली या ठिकाणी भेट दिली
नांदेड़ जिल्हा दौरा दरम्यान सचिन भाऊ साठे यांनी हदगाव या ठिकाणी धावती भेट दिली या वेळी हदगाव येथील मातंग वस्ती मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन पूतल्याचे हार घालून अभिवादन करण्यात आले व वाळकी (बा) आणि हदगाव या ठिकाणी मातंग समाजाला मार्गदर्शन केले या वेळी त्यांनी लहूजी साळवे
कर्मचारी कल्याण महासंघाचे महासचिव गुणवंत काळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयाला हार अर्पण करून सभा घेण्यात आली.
त्यानी आपले विचार मांडतांना समाजाने जागृत होऊन स्वतः चे अस्तित्व निर्माण करावे स्वभिमानी राहुन अन्यायचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज रहावे असे आहवान केले पुढे बोलतांना ते म्हणाले मातंग समाजावर महारष्ट्र राज्य मध्ये अन्यायांची परिसीमा वाढत असून तो रोखण्यासाठी मातंग समाजाने एकजुट व्हावी ज्या प्रमाणे दगड़ा जवळ दगड जमल्याने एक विशाल भिंत तयार होते त्यांच् प्रमाणे माणसा जवळ माणुस आल्याने प्रचंड ताकत ऊभी होते आणि प्रतिकार करण्याची ताकत निर्माण होते
तेव्हा समाजाने संघटतीत होण्याची गरज आहे असे आव्हान त्यानी केले.
या वेळी गुणवंत काळे महासचिव लसाकम, महाराष्ट्र अध्यक्ष आर.बी.साठे, राष्ट्रीय सचिव गणेश भगत, बालासाहेब खानझोडे मराठवाडा सचिव,शिवाजी मात्रे हदगाव तालुका अध्य्क्ष मानवहित लोकशाही पक्ष, महानगर अध्यक्ष प्रविन बसवंते, जयराम वाघमारे, ऊतम भांडवले लसाकम ता.अध्यक्ष, मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा सचिव किशन कांबळे, वंदना पात्रे,भगवान खानझोडे, लखन तलवारे, कैलास तलवारे,सचिन मुगटकर,के.डी. पवार,समाज बांधव उपस्थितीत होते.