सांस्कृतिक कार्यक्रमात युनिवर्सल इंग्लिश चा प्रथम क्रमांक.
सांस्कृतिक कार्यक्रमात युनिवर्सल इंग्लिश चा प्रथम क्रमांक.
उमरखेड
उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सांस्कृतिक कार्यक्रमात उमरखेड च्या एकुण पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता. सर्वच शाळांनी एकापेक्षा – एक चांगले दर्जेदार कार्यक्रम सादर केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक युनिवर्सल इंग्लिश मेडीयम स्कूल चा महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम सर्वोत्कृष्ट ठरला.
उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देउळगावकर यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



