विद्यानिकेतन हायस्कूलची कोरोना काळातही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.
विद्यानिकेतन हायस्कूल ची कोरोना काळातही 100%
निकालाची परंपरा कायम
औरंगाबाद –
विद्यानिकेतन हायस्कूल एन 4 सिडको औरंगाबाद*
एस.एस.सी. मार्च 2021 निकाल
1.काजल फोनावणे 99.80%*
2.निकिता पवार 97.80%*
3.युवराज चव्हाण 96.80%*
5.वेदांत राठोड 96.80%*
6.साक्षी पालवे 96.60%*
*5.भागवत घरत 96.00%*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर झाला आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यानिकेतन हायस्कूल एन 4 सिडको औरंगाबादच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे…
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे अभ्यासक्रम पूर्ण केला होता व या निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत शाळा व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. यात हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रा.आर.बी.अंभोरे,सौ. व्हि.बी.गायकवाड,श्रीमती साखरे,श्रीमती पवार, श्री.एस. एन गाडेकर,डी.एस.सुरडकर,एस,एम उकरंडे,व्ही.पी.कुलकर्णी, पी.डी.वैराळ,एस,के,कांबळे,एस वाय पाटील, यांच्या कामगिरी आणि सहकार्याबद्दल पूर्णयोगी जनार्दन स्वामी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव श्री पी एन गाडेकर यांनी विद्यानिकेतन हायस्कूल च्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले आहे व विद्यार्थ्यांच्या पुढील उज्वलभविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.