श्री.संत बाळगीर महाराज स्वच्छता अभिमान माहुर द्धारे मरसुळ येथे ग्रामस्वच्छता अभिमान.
श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान माहूर द्वारे मरसुळ येथे ग्रामस्वच्छता अभियान
प्रतिनिधी / ६ फेब्रुवारी
उमरखेड – सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर आनंद दत्त धाम आश्रम माहूर संचालित श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान द्वारे उमरखेड तालुक्यातील मरसुळ येथे दिनांक साहा फेब्रुवारी रोजी येथे गावकऱ्यांच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून या अभियानांतर्गत मरसुळ येथील संपूर्ण गावकऱ्यांनी उपस्थित राहून सर्वांनी झाडू हातात घेऊन संपूर्ण गावातील रस्ते झाडून संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले आहे .गुरुवर्य साईनाथ महाराज वसमतकर यांच्या शिष्य मंडळीनी मरसुळ गांवात ६ फेब्रुवारी रोजी किर्तन व काल्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
आयोजित ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी साईनाथ महाराज यांनी सार्वत्रिक राष्ट्रगीत घेऊन गावातील नागरिकांना शिक्षण वेसन मुक्ती अशा विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे श्री संत बाळगीर महाराज ग्राम स्वच्छता अभियान आनंद दत्त धाम आश्रम माहूर च्या माध्यमातुन साईनाथ महाराज वसमतकर यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियाना चा वसा त्यांनी उचलेला असून गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबवून गांवातील नागरिकांना ग्राम स्वच्छते कडे वळविले आहे त्यामुळे साईनाथ महाराजांची हि ओळख सर्वाप्रती आदराची ठरत आहे
मरसुळ येथील ग्राम स्वच्छता मोहिम मध्ये जेष्ठ माजी सैनिक गंगाराम हुंबे , सरपंच मनोज कुबडे , उमरखेड वकिल संघटनेचे सचिव अँड निरजंन कदम , प्रभाकर फाळके , बाभनाजी पैकीने , यांच्या सह गांवातील महिला व पुरुषांनी या कार्यात सहभाग घेऊन ग्रामस्वच्छतेचे अभियानातून संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले आहे .
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.com/it/join?ref=JHQQKNKN