मराठा आरक्षण मागणी आंदोलक शांतता प्रिय मार्गाने करत असतांना पोलीस प्रशासनाद्वारे दडपण्याचा प्रयत्न – उपोषण स्थळी पत्र परिषद घेऊन सकल मराठा समाजाचा आरोप .
मराठा आरक्षण मागणी आंदोलक शांतता प्रिय मार्गाने करत असतांना पोलीस प्रशासनाद्वारे दडपण्याचा प्रयत्न ; उपोषण स्थळी पत्र परिषद घेऊन सकल मराठा समाजाचा आरोप .
३१ ऑक्टोंबर
उमरखेड –
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज शांतता व सवैधानिक मार्गाने आरक्षण मिळवून घेण्यासाठी मोर्चे, आमरण उपोषण , रास्ता रोको , पदाचे राजीनामे आणि नदी पात्रात उतरून जलसमाधी असे विविध प्रकारचे आंदोलने करत असतांना शांतता प्रिय आंदोलकांना स्थानबध्द करून सुरु असलेले आंदोलन थांबविण्याचा राज्य सरकार स्थानिक पोलीस प्रशासनाकडून केविलवाणा प्रयत्न करू पहात आहे . मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत आंदोलने सुरु ठेवणार असून या चाललेल्या प्रकाराचा सकल मराठा समाजाने निषेध व्यक्त केला आहे .
शासनाने अधिक अंत न पहाता मराठा समाजाला सवैधानिक मागणीतुन सरसगट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे तरच आंदोलन थांबेल अन्यथा विदर्भ – मराठवाडा महामार्ग बद करू असा इशारा तहसिल कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी ३१ ऑक्टोबर रोजी सांयकाळ दरम्यान या मुद्यावर पत्र परिषद घेवून चळवळीच्या नेत्या सरोज देशमुख यांनी या घडामोडीवर अधिक माहिती पत्रकारांना दिली .
यावेळी उपोषणकर्ते सचिन घाडगे व सुदर्शन जाधव तसेच समन्वय समितीचे भिमराव चंद्रवंशी , प्रमोद देशमुख , स्वप्नील कणवाळे , विनायक कदम , गणराज कदम, डॉ . कल्याण राणे , आशा देवसरकर यांचे सह अन्य आंदोलक उपस्थित होते . काल ३० आक्टोबर रोजी मुख्यमंत्र्याच्या सभ स्थळी यवतमाळ भेटीला जाण्यासाठी निघालेल्या सरोज देशमुख यांना पोलीसांनी पळशी फाट्यावर अडवून स्थानबध्द करण्यात आले . सनदशीर हक्कापासुन मराठा आंदोलकाला दुर केल्याने पोलीसांच्या त्या कामगीरी बद्दल यावेळी खेद व्यक्त केला आणि या कृत्या बदल आपन वरिष्ठांकडे रितसर तक्रार करणार असल्याचे आवर्जून सांगीतले . व पुढिल आंदोलनाच्या दिशेची सुद्धा माहिती दिली .
असे आयोजित तातडीने घेतलेल्या पत्र परिषदेत सरोज देशमुख विशेष करून यानी सांगीतले.