नारी सशक्त असेल तरच देश समृद्ध होईल आमदार किसन वानखेडे : उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन

नारी सशक्त असेल तरच देश समृद्ध होईल
आमदार किसन वानखेडे
: उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन
: आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी
उमरखेड –
जात धर्म पंथ न पाहता डॉक्टरांनी आरोग्यसेवा चांगली व दर्जेदार दयावी माता भगिनीचे आरोग्य सशक्त असेल तरच देश समृद्ध होईल असे प्रतिपादन उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी केले .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्याचेच औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .
अनेक कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली येत असून त्यांच्याकडे उपचार करण्याकरता तसेच शस्त्रक्रिया करण्याकरिता पैसे नसतात अशावेळी कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत असते मात्र आता आरोग्याच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजना आहे . ज्यांच्याकडे सदर योजनेचे कार्ड आहे त्यांच्यावर पाच लाख रुपया पर्यंत मोफत उपचार होत आहेत त्याचा फायदा रुग्णांनी घ्यावा मी गरिबीतून आलेला गरिबाचा आमदार आहो २४ तास मी आपल्या सेवेसाठी तयार आहो रुग्णांसाठी जर माझ्या शिफारस पत्राची गरज भासल्यास ते रुग्णासाठी देण्यास मी सदैव तयार असल्याचे देखील आमदार वानखेडे यांनी सांगितले .आपले कुटुंब समजून डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करावे कुटुंब सशक्त झाले तर देश सशक्त होईल .
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला मोदी सरकारने त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर उभारून आतंकवाद्याना ठार केले .त्याचे नेतृत्व कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर योमिका सिंह यांनी केले त्यांचा अभिमान सर्व देशवासियांना असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले . यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ किशोर कपाळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . माधव शिंदे , डॉ .संभाजी डोंगे ,डॉ किशोर राठोड , डॉ अविनाश खंदारे पत्रकार , दत्तात्रेय काळे , अरविंद ओझलवार , सविता चंद्रे , अशोक गांजेगावकर हे न्यासपिठावर होते तर डॉ . जयराम बस्सी , डॉ नितीन अक्कमवार , डॉ . रितेश कलमुर्गे, डॉ धनंजय गोरे , डॉ दवणे , डॉ . रिठे , साधना चलावार , माया मडावी यांचे सह सर्व वैद्यकिय कर्मचारी वृंद उपस्थित होते . सुत्रसंचालन व आभार वैशाली धोंगडे यांनी केले .
सोबत फोटो
You got a very superb website, Gladiolus I detected it through yahoo.