माहूर तहसील कार्यालयात यात्रा व्यवस्थापनाची बैठक संपन्न! बैठकीला अनेक विभाग प्रमुखखांची दांडी.

youtube

माहूर तहसील कार्यालयात यात्रा व्यवस्थापनाची बैठक संपन्न!

बैठकीला अनेक विभाग प्रमुखखांची दांडी.।

श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम

देवि देवतांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणार्‍या माहूरगडावर १० व ११ आॅगष्ट रोजी संपन्न होणार्‍या राखी पौर्णिमेची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दि.५ आॅगष्ट २०२२ रोजी दु. १२:३० वाजता तहसील कार्यालयात तहसिलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली तर नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नायब तहसिलदार गोविंदवार, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा व्यवस्थापनाची बैठक संपन्न झाली.

संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले होते कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ताळेबंदी घोषित करुन राज्यातील मंदिरे, यात्रेवर बंदी घातली होती, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा रद्द करण्यात आली होती. प्रशासनाने कोरोना रोगाची पार्वभूमी लक्षात घेत आता ताळेबंदी उठविली असल्याने माहूर गडावर दि.१० आॅगष्ट पासून सुरु होणार्‍या राखी पोर्णीमा (पंचकोशी)यात्रेनिमीत्त गडावर लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असून या यात्रेदरम्यान सह्याद्री पर्वताला पाच कोस वेढा (प्रदक्षिणा)घातली जाते या वेढ्याला महापुरूषांच्या मार्गदर्शनात दत्तशिखर येथून सायंकाळी सुमारे ६ वा.सूरवात होत असून रात्रभर रभाविक अनवानी पायी चालत ही यात्रा करीत असतात, तसेच माहूर परिसरातील पाणीसाठे तुडुंब भरली आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी तहसिलदार किशोर यादव यांनी सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलावून आपली जबाबदारी निमूटपणे पार पाडावी अशा सर्व संबंधितांना सूचना दिल्या तसेच तहसिलदार किशोर यादव यांनी मी नव्यानेच रूजू झालो असून या यात्रेबदल स्थानिकांनी माहिती द्यावी असे सूचविले त्यानुसार द पॉवर ऑफ मिडियाचे तालुका अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार,पूजारी विजय आमले यांनी या यात्रेबाबत सविस्तर माहिती दिली व या बैठकीस नेहमीप्रमाणे अनुपस्थित राहणार्‍या, वनविभाग, पुरातत्व विभागासह दांडी बहादर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली, या बैठकीला मुख्य लिपिक संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी आशिष पवार, विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता कोठे,ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. अभिजित अंबेकर, नगर पंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी, श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे, दत्तशिखर संस्थानचे व्यवस्थापक उज्वल भोपी, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, बालाजी कोंडे यांचेसह प्रतिष्ठित नागरीक व पत्रकार उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!