नाल्याच्या पुरामध्ये गाडी बैलांसह महिला गेली वाहून.

youtube

नाल्याच्या पुरामध्ये गाडी बैलांसह महिला गेली वाहून.

यवतमाळ
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथील नाल्याला आलेल्या पुरामध्ये गाडी बैलांसह महिला वाहून गेल्याची घटना घडली.
कमलाबाई पवार वय पन्नास वर्षे असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे तीचा अद्याप शोध लागलेला नाही. घटनेत दोन बैल व गाडी पुरामध्ये वाहून गेली. कमलाबाई सोबत असलेली महिला आणि मारुती पवार या दोघांचे सुदैवाने जीव वाचले. सदर घटना आज दुपार दरम्यान घडली. मुडाणा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नाल्याला मोठा पूर आला आहे. संबंधित गावचे तलाठी डी. बी. चव्हाण व यंत्रणा घटनास्थळावर वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहेत.

1 thought on “नाल्याच्या पुरामध्ये गाडी बैलांसह महिला गेली वाहून.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!