स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या युवक यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी लोकपाल पाटील माने यांची निवड

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या युवक यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी लोकपाल पाटील माने यांची निवड
उमरखेड : यवतमाळ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यवतमाळ नांदेड जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यासह विविध आघाड्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यावेळी सर्वानुमते लोकपाल पाटील माने यांची यवतमाळ जिल्हा युवक पदी निवड करण्यात आली. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यवतमाळ नांदेड आयोजित आढावा बैठकीमध्ये विविध पदाच्या निवड करण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा. रेणुकाताई मोरे नेत्र सहाय्यक आघाडी प्रदेशाध्यक्ष गजानन माने तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत ज्वलंत असलेल्या शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना हमीभाव, विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणी आणि कामगारांच्या हक्कांबाबत ठोस भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले. संघटनेच्या पुढील कार्ययोजनांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
Aegean tours Turkey Patrick L. – Tayland https://ghasrconew.ir/?p=7615