प्राचार्य डॉ . वि . ना . कदम यांच्या ” झाड आणि झेंडा” या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळ.

प्राचार्य डॉ . वि . ना . कदम यांच्या ” झाड आणि झेंडा” या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळ
उमरखेड तालुक्यातील साहीत्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक, लेखक, कवि यांच्या सत्काराचे आयोजन
प्रतिनिधी
उमरखेड :
दि . ६ ऑगष्ट २० २३ रविवारी दुपारी २ वाजता आर्य वैश्य भवन बस स्टेड समोर उमरखेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य सैनिक कै . नामदेवराव कदम आणि अनेक संकटाशी एकटीच झुंजणारी कै. यमुनाबाई कदम यांचे सुपुत्र प्राचार्य डॉ वि . ना . कदम यांच्या” झाड आणि झेंडा” या पुस्तकाचे (आत्मकथनाचे ) प्रकाशन होणार आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा साहीत्य परीषदेचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्री कौतिकराव ठाले पाटील हे राहणार असुन श्री डॉ .. श्रीपाल सबनीस अध्यक्ष ८९ वे अ. भा . मराठी साहीत्य सम्मेलन पुणे यांच्या हस्ते आत्मकथनाचे प्रकाशन होणार असुन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड महागांव चे आमदार नामदेवराव ससाणे ,डॉ .या . मा . राऊत सचिव, य. जि . अखिल कुणबी समाज, डॉ . विजयराव माने कृषी शास्त्रज्ञ पं. कृ . विद्यापीठ अकोला हे राहणार आहेत व तसेच या पुस्तकावर मराठी भाषा अभ्यासक श्री प्रा . डॉ . रामचंद्र काळुंखे जेष्ठ समीक्षक, संभाजीनगर आणि श्री देविदास फुलारी जेष्ठ साहित्यीक, नादेड हे ग्रंथ भाष्य करणार आहेत
तरी लेखक, कवि आणि साहित्यरशीकांनी या कार्यक्रमाला उपस्थीत रहावे असे आवाहन श्री भगवानराव कदम सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उमरखेड यांनी केले आहे .