ढाणकी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी हिरासिंह चव्हाण.
ढाणकी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी हिरासिंह चव्हाण.
ढाणकी/ प्रतिनिधी :
श्री दत्त संस्थान टेंभेश्वर खांड ढाणकी येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने भव्य जंगी यात्रा व दिव्य पालखी छबिना सोहळ्याचे आयोजन, दरवर्षी नित्यनेमाने करण्यात येत असते. या भव्य दिव्य यात्रेचे आयोजन दरवर्षीच ढाणकीकर मोठ्या उत्साहात व आनंदात करीत असतात. एवढी मोठी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी, गावातून दरवर्षी यात्रा कमिटी नेमल्या जात असते. यावर्षीच्या यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी ढाणकी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते हिरासिंह चव्हाण यांची, ढाणकी शहरातील प्रतिष्ठित डॉ. लक्ष्मीकांत रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत, संपूर्ण गाववासीयां तर्फे सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीला ढाणकी शहरातील व्यापारी महासंघ, सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी दुजोरा दिला.
सदर यात्रा ही २० डिसेंबर पासून सुरू होत असून, यात्रेत दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन, भव्य दिव्य बक्षीसांसह करण्यात येत असते. सदर यात्रा यशस्वीपणे पार पडावी याकरिता, सर्व ढाणकीवासीयांनी तसेच यात्रेमध्ये सर्व दुकानदारांनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी व सहकार्य करावे. असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष हिरासिंह चव्हाण यांनी केले आहे.
Noodlemagazine naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.
Glue Dream strain I very delighted to find this internet site on bing, just what I was searching for as well saved to fav
Bahçelievler su kaçak tespiti Yeniköy su kaçağı tespiti: Yeniköy’de su kaçağını modern yöntemlerle tespit ediyoruz. https://www.bseo-agency.com/ustaelektrikci