छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंप जागेची प्रशासनाने केली मोजणी उमरखेड –

youtube

छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंप जागेची प्रशासनाने केली मोजणी

उमरखेड –

शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा उभारणी कार्य मागील काही महिन्यापासून सुरु आहे
छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्याच्या सौंदरीकरण कार्यास अडथळा होत असल्याने व महाराजांचा पुतळा मोकळा दिसण्यासाठी अतिक्रमाणित असलेल्या जागेत जवळील पेट्रोल पंप इतरत्र या ठिकाणावरून हटवावा व संबंधित पेट्रोल पंपाची शासनाने लीज वाढवून देऊ नये ही प्रमुख मागणी समोर करीत तिघा शिवभक्तांनी हा मुद्दा समोर करीत आश्वारूढ पुतळ्याच्या बाजूला सलग बारा दिवसापासून आमरण उपोषण सुरु ठेवले आहे
दिनांक २९ जून रोजी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरडकर या दोन्ही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघा आंदोलन कर्ते गजानन देशमुख, या सह गुलाब सूर्यवंशी, विष्णु गोरे यांची उपोषण मंडपास थेट भेट घेत अतिक्रमणित जागेत असलेल्या पंपाची स्थळ पाहणी करून रीतसर मोजणी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते
दिनांक ३० जून रोजी नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणी पथक, उमरखेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भूमिअधीलेख अधिकारी, नगरपरिषद संबंधित विभागाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पेट्रोल पंपाच्या सभोवताली जागेची उपस्थित दस्तावेज प्रमाणे आंदोलन कर्त्याच्या प्रतिनिधी समक्ष संबंधित जागेची मोजणी करण्यात आली
उपोषण कर्ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम असुन मोजणी केलेल्या जागेची प्रत्येक्षरित्या अतिक्रमण हटविण्याची कारवाई होत नाही तो पर्यंत आरंभ केलेल्या उपोषणाचा लढा मागे घेणार नाही अशी तटस्थ भूमिका आंदोलन कर्ते तिघा शिव भक्तांनी कायम ठेवली आहे त्यामुळे मोजणी केलेल्या जागेतील अतिक्रमण हटवून प्रशासन काय कारवाई करेल या कडे शहरातील सर्व जणांचे लक्ष लागुन राहिले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!