राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची उमरखेड येथे सदिच्छा भेट

youtube

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची उमरखेड येथे सदिच्छा भेट

उमरखेड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब यांनी उमरखेड येथील राष्ट्रवादी चे राजू भैय्या जयस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी उमरखेड तालुक्यातील पक्ष संघटनाची बांधणी, पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे बळकटीकरण तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. येणाऱ्या काळात उमरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून, त्या मेळाव्यासाठी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन मा. शशिकांत शिंदे साहेब यांनी दिले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे प्रदेश चिटणीस प्रदीप पाटील देवसरकर, ओबीसी सेलचे विदर्भ प्रमुख भास्करराव पंडागळे, विधानसभा अध्यक्ष राजू भैया जयस्वाल, तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील कवळे, गोविंद इंगोले तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!