यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; जबरी चोरीचे २ व शेतीविषयक चोरीचे ६ असे एकूण ८ गुन्हे उघड, १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त पुसद –

youtube

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; जबरी चोरीचे २ व शेतीविषयक चोरीचे ६ असे एकूण ८ गुन्हे उघड, १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त

पुसद –

पुसद शहर व वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीचे दोन तसेच शेतीविषयक चोरीचे सहा असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम, मोटारसायकल, चांदीच्या अंगठ्या तसेच कॉपर वायर असा १ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

७ जुलै २०२५ रोजी पुसद बसस्थानक परिसरात अरविंद दारासिंग चव्हाण यांचा मोबाईल व ३७ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने हिसकावून नेण्यात आली होती. त्याच दिवशी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण श्रावण राठोड यांना कमी पैशांत पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसवून देण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवरून पंचायत समिती संकुलाच्या मागे नेण्यात आले. तेथे त्यांच्याकडील ५ हजार रुपयांची रोख रक्कम व दोन चांदीच्या अंगठ्या जबरीने लुटण्यात आल्या. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्ह्यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अयाज अहमद एजाज अहमद (वय ३२, रा. मधुकर नगर, पुसद) व त्याच्या विधीसंघर्षग्रस्त साथीदाराला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी कसून चौकशीनंतर दोन्ही जबरी चोरीचे गुन्हे कबूल केले.

आरोपींकडून जबरी चोरीतील मोबाईल, रोख रक्कम, मोटारसायकल, आरोपींचे मोबाईल तसेच ८ किलो ५०० ग्रॅम कॉपर वायर असा १ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत आरोपींनी पुसद ग्रामीण, खंडाळा, वसंतनगर व महागाव परिसरातील शेतांमधील मोटारपंप व केबल चोरीचे आणखी सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे एकूण ८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमर मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, पुसद शहरचे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहीरकर आणि वसंतनगरचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पुसद शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.

6 thoughts on “यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; जबरी चोरीचे २ व शेतीविषयक चोरीचे ६ असे एकूण ८ गुन्हे उघड, १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त पुसद –”

  1. [2678]Rivalrybet Login PH – Mabilis na Gcash Casino at Slots,Gamitin ang rivalrybet login ph para sa mabilis na gcash casino. Mag-download ng APK at subukan ang online slots na may bonus. Mag-register na rito! visit: rivalrybet

  2. [1457]bet365 একাউন্ট খোলা ও বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট,bet365 অ্যাপ ডাউনলোড করে অনলাইনে স্লট গেম খেলা শুরু করুন। লাইভ ক্যাসিনো বোনাস অফার বুঝে নিন এবং আজই আপনার একাউন্ট রেজিস্টার করুন। visit: bet365

  3. Hi there! I jusst wantedd tto ask iif you evber have anyy trouble witgh hackers?
    My lst blog (wordpress) wwas hackeed annd I ended upp losing a few months off hard work duue tto no backup.
    Do youu havee any methods to prevebt hackers? xnxx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!