१ लाख २८ हजार तुप दिपोत्सव ज्वलनाचा सामुहिक उत्सव ; मरसुळ – दत्तनगर भाविकांकडुन कार्यक्रमाचे आयोजन उमरखेड –
१ लाख २८ हजार तुप दिपोत्सव ज्वलनाचा सामुहिक उत्सव ; मरसुळ – दत्तनगर भाविकांकडुन कार्यक्रमाचे आयोजन
उमरखेड –
मरसुळ गांवातील एकत्रितपणे असे साडे तिन कोटी नामस्मरण पुर्णत्वाकडे नेल्याबद्ल दिनांक २ ते ५ फेब्रवारी या तिन दिवसीय कार्यक्रमात मरसुळ – दतनगरच्या भाविकांकडून पुढाकारांतुन १ लाख २८ हजार तुप दिपोत्सव ज्वलनाचा सामुहिकपणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
२ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद ठेवण्यात आला असून सांयकांळी महापुजेला सुरुवात होणार आहे त्या नंतर ५ फेब्रुवारी गुरुवार रोजी दत्तमहाराज , हनुमान आणि महादेव अभिषक झाल्या नंतर दुपारी १ ते ४ पर्यंत महाआरती लगेचच गांवात पालखी नगर प्रदक्षणा त्यानंतर सायंकाळ दरम्याण च्या वेळात प्रत्येकांच्या घरा – घरा समोर दिपोत्सव साजरा होणार ९ वाजताच्या महापुजे नंतर उत्तर रात्री सकाळी नामसंकल्प उजळणी कार्यक्रम गुरुवर्य भगवानगीर महाराज यांच्या उपस्थित या कार्यक्रमा सह काकडा आरती होईल अशा पद्धतीने पुढे दोन वर्ष सांप्रदाय भाव कार्यक्रमाची आखणी रूप रेषा सलग कायमपणे तिन वर्ष राहणार आहे होणाऱ्या तुप दिपोत्सवामुळे या परिसरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव दुर होण्यासाठी या उत्सवाचे फलीत स्वरुपात जानवणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या निमित्ताने भजणी मंडळाचे जेष्ठ अभ्यासक पदाधिकारी बबन शिरडकर , आनंदराव काकडे आणि अवधुत देशमुख यांनी सर्वांच्या वतीने सांगीतले आहे



