शिवाजी महाराज पुतळा समितीचे उपोषण १४ व्या दिवशी सुटले – प्रशासनाकडून कारवाईचे लिखित आश्वासन उमरखेड | ३० जून २०२५

शिवाजी महाराज पुतळा समितीचे उपोषण १४ व्या दिवशी सुटले – प्रशासनाकडून कारवाईचे लिखित आश्वासन
उमरखेड | ३० जून २०२५
छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा उभारणीसंदर्भातील मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी सरबत पिऊन उपोषण सोडले.
पुतळा कृती समितीचे गजानन देशमुख, गुलाबराव सूर्यवंशी, विष्णू गोरे आणि प्रवीण देशपांडे हे नागरिकांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. उपविभागीय अधिकारी मुळे यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि कारवाईबाबत ठोस आश्वासन दिले.
प्रमुख मागणी भारत पेट्रोलियमला दिलेल्या लिज क्षेत्राच्या बाहेर करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत होती. यावर प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि भूमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी केली. त्यानुसार पेट्रोल पंपाने दोन मीटर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले असून, दिनांक १ जुलै २०२५ रोजी अधिकृत नोटीस देऊन कायदेशीर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येणार आहे.
यासोबतच मागील २० वर्षांपासून लिज वाढवून देण्याच्या प्रक्रियेवरही कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. लिज रद्द करण्याबाबतचा अहवाल सात दिवसांत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे पाठवला जाणार असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही लेखी आश्वासन देण्यात आले.
या सकारात्मक आश्वासनानंतर उपोषणकर्ते आणि कृती समितीने उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. शहरात प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.बाबतच्या मागणी नुसार पुढील सात दिवसांमध्ये तसा अहवाल तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत मा. जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांना पाठविण्यांत येईल व शेवट पर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यांत येईल.
14 दिवसापासून सुरू असलेले उपोषणाची अखेर सांगता एसडीम मुळे यांच्या हस्ते आम्ही करीत असलेल्या उपोषणाला आपल्या पत्रानुसार आम्ही सदर उपोषण तात्पुरते संकरित करत आहोत आम्ही मागील 18 /6 / 25 पासून आमरण उपोषणाला बसलो आहे आमच्या मागण्याप्रमाणे कारवाई झाली नाही तर आम्ही दिनांक 10 / 7/ 2025 पासून परत अन्न त्याग उपोषण करणार आहे तेव्हा हीच आमची दहा सात पंचवीस पासून सुरू होणारा करेल
उपोषण सोडताना गोपाल अग्रवाल, राजेश कवाने, रमेश चव्हाण,मंडळ अधिकारी व शेवप्रेमी तसेच सर्व प्रशासकीय व राजकीय सर्वांच्या समवेत हे उपोषणाची सांगता करण्यात आली .