कुजलेल्या खुनाचा गुन्ह्याचा २४ तासाचे आत ऊलगडा, पोलीसांचे प्रयत्नांना यश, आरोपी ताब्यात.

उमरखेड येथील कुजलेल्या खुनाचा गुन्ह्याचा २४ तासाचे आत ऊलगडा, पोलीसांचे प्रयत्नांना यश, आरोपी ताब्यात
उमरखेड –
पोलीस स्टेशन उमरखेड येथे दिनांक ०३/०३/२०२३ रोजी दाखल मिसिंग क्रमांक १०/२०२३ चे तपासादरम्यान बाळदी रोड च्या आय.टी.आय. कॉलेजच्या मागे उमरखेड येथे जंगल परीसरात चार दिवसानंतर कुजलेल्या स्थितीत मिळालेल्या मृत पुरुष ईसमाचे मृतदेह शरीरा संबंधी तात्काळ दखल घेवून खात्रीसह फिर्यादी नामें अंकुश नारायण मिराशे रा. बाळदी यांचे कडून ओळख पटवून तो गोपाल सुधाकर मिराशे रा. बाळदी असल्याने शवविश्चेदन प्राथमिक अहवालानुसार चाकुचे घाव असल्याचे निष्कर्श आल्याने घेवून अज्ञात आरोपी ईसमाविरुद्ध अपराध क्रमांक १६० / २०२३ कलम ३०२ भादवी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मृतकाचे संपूर्ण शरीर बरेच प्रमाणात कुजलेले असल्याने तसेच घटनास्थळ मुख्य गावंपासून साधारणतः ०३ कि.मी. अंतरावर निर्जन स्थळ असून प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध होणे कठीन असल्याने गुन्हा उघडकीस आणन्याचे मोठे आव्हान पोलीसांपुढे उभे राहीले होते.
नमुद गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधिक्षक सा. डॉ. श्री. पवन बन्सोड यांनी घटनास्थळावर मिळालेले वस्तुजन्य पुरावे, मृतकाचे घर व कामाचे ठिकाणी लोकांची चौकशी सह सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करुन गुन्हा उघडकीस आणन्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार पोलीस स्टेशन उमरखेड तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे उद्देशाने पथके निर्माण करुन नमुद पथकांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे व नमुद माहिती तसेच तांत्रिक माहितीचे आधारे शहानिशा केल्यावर गुन्ह्यातील संशईत ईसम नामें राहुल भगवान तपासे वय २२ वर्ष, नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ यास कसोसीचे प्रयत्न करुन ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे २४ तासाचे आत अतिषय क्लिष्ट गंभिर गुन्हा उघडकीस आणन्यात पोलीस यंत्रनेस यश प्राप्त झाले आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. डॉ. पवन बनसोड साहेब, पोलीस अधिक्षक जिल्हा यवतमाळ मा. श्री. पियुष जगताप साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक जिल्हा यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाडवी साहेब उमरखेड, पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप परदेसी साहेब स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस स्टेशन उमरखेड चे ठाणेदार श्री. अमोल माळवे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उमरखेडचे मसपोनि सुजाता बन्सोड, सपोनि प्रशांत देशमुख, पोउपनी अमोल राठोड, पोउपनी शिवाजी टिपुणे, पोउपनी चंदु चौधरी, पोहवा/ विजय पंतंगे, नापोका कैलाश नेवकर, नापोका संदीप टाकुर, नापोका / रोषण सरनाईक, नापोका नरेंद्र पुंड, नापोका / राजु पवार, नापोका अतुल तागडे, नापोका/ दत्ता पवार, पोका/नितीन खवडे, पोका / हिम्मत बंडगर, पोका नितेश लांडे, पोका सुदर्शन जाधव, पोका/ सूर्यकांत गित्ते, पोका प्रविन वंजारे सोबत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सपोनि अमोल सांगळे, पोउपनी सागर भारस्कर, पोहेका सुभाष जाधव, नापोका / पंकज पातुरकर, नापोका/ सोहेल मिर्झा, पोका/ मोहम्मद ताज, पोका/ सुनिल पंडागळे, चालक पोका/ दिगांबर गिले तसेच सायबर सेल यवतमाळ तसेच सेवानिवृत्त स. फो. दिपक कांबळे येथील तांत्रिक तज्ञांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.