सदभावना  डेपोतील लुटपाट प्रकरणी पाच जणांना अटक : १६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी – या प्रकरणात बडे प्रतिष्ठीत अटकण्याची शक्यता   उमरखेड :

youtube

सदभावना  डेपोतील लुटपाट प्रकरणी पाच जणांना अटक : १६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी – या प्रकरणात बडे प्रतिष्ठीत अटकण्याची शक्यता

उमरखेड :

सद्भावना डेपोतील लुटपाट प्रकरणी पाच जणांना अटक : १६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी : या प्रकरणात बडे प्रतिष्ठीत अटकण्याची शक्यता !

प्रतिनिधी । उमरखेड :

तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर तुळजापूर महामार्गाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या सद्भावना कंपनीच्या डेपोचे कार्य हे काही दिवसापूर्वी पूर्ण झाले होते . अशातच दिनांक एक व दोन ऑगस्ट रोजी बंद असलेल्या या कंपनीच्या डेपोतून नागरिकांनी व तसेच त्या कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजर यांनी तब्बल १ कोटी ६० लाख व नंतर ७२ लाख असा वाहनासह मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी कंपनीच्या हेड मॅनेजर कडून तक्रार दाखल झाल्यानंतर ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असतांना या लुटपाट प्रकरणाचा तपास आपीएस अधिकारी यांचेकडे वर्ग करण्यात आल्याने या लुटपाट प्रकरणात आज दिनांक १३ रोजी तब्बल पाच संशयीत आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३ दिवसाची पोलिस कस्टडी सुनावण्यात आल्याने या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे .
या प्रकरणी नंदु बळीराम राठोड ( ४९ ) रा .झाकीर हुसेन वार्ड, दर्शन संतोष भंडारी ( ३० ) फॅक्ट्री वार्ड, प्रकाश संतोष वानखेडे ( २७ ) नाग चौक, शेख आबेद शेख युनुस (२५ ) सर्व रा. उमरखेड व लखन धनसिंग जाधव (२२ ) रा महागाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार नागपूर तूळजापुर महामार्गाचे उमरखेड पासून वारंगा जी. नांदेड पर्यंत काम करणाऱ्या सद्भावना कनस्ट्रक्शन कंपनीचा डेपो महागाव रस्त्यावर उभारण्यात आला होता . दरम्यान कामाचा कार्यकाळ संपल्याने डेपो बंद होता . अशातच दिनांक १ ऑगष्ट व २ ऑगष्ट रोजी याच डेपोत कार्यरत असणाऱ्या कर्मचार्‍यांनी इतर जणासोबत संगनमत करून लाखों रुपयाच्या वाहनासह भंगाराची लुटपाट केली होती . सदर लूटपाटीतील १ कोटी ६० लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हेड मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरुन जप्त केला मात्र त्यानंतर पुन्हा ७१ लाखाची चोरी झाल्याची पुरवणी तक्रार जोडण्यात आली होती त्यानुसार या लूटपाट प्रकरणाची गंभीरता पाहता जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणाचा तपास आय पी एस अधिकारी हर्षवर्धन बी . जे . यांचेकडे सुपुर्द केला . त्यांनी तपासाची चक्रे फिरवून या लुटपाट प्रकरणात गुन्हे नोंद झालेल्या ४ आरोपी पेक्षा जास्त आरोपी असल्याचे निर्दशनास आल्याने यामध्ये लुटपाट करणाऱ्या वरील ५ आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर करून येत्या १६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी मिळवीली असून यामध्ये बरेचसे प्रतिष्ठीत मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . या प्रकरणाचा तपास एपिआय रवि चव्हाण ( पुसद ) हे करित आहेत .
सोबत फोटो :
आरोपींना न्यायालयातून नेतांना पोलिस अधिकारी

Google Ad
Google Ad

12 thoughts on “सदभावना  डेपोतील लुटपाट प्रकरणी पाच जणांना अटक : १६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी – या प्रकरणात बडे प्रतिष्ठीत अटकण्याची शक्यता   उमरखेड :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!