ढाणकी येथे अवैध देशी दारुसह तब्बल ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त.

ढाणकी येथे अवैध देशी दारुसह तब्बल ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त.
[API सुजाता बनसोड व बिटरगाव पोलिसांची बेधडक कारवाई.]
ढाणकी/ प्रतिनिधी :
बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नुकत्याच रुजू झालेल्या, प्रथम महिला ठाणेदार सुजाता बनसोडे यांनी ढाणकी व परिसरातील अवैध धंद्यावर, एकापाठोपाठ एक धाडसत्र सुरूच ठेवले असून, यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे पुरते दणाणले असून, आता मात्र खऱ्या अर्थाने ढाणकी व परिसराला कर्तव्यदक्ष ठाणेदार भेटल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
दि. १४ जुलै रोजी, गोपणीय माहितीवरून स्वप्निल रमेश पराते वय २५ रा. ढाणकी, हा अवैध देशी दारू वाहतूक करताना मिळून आला. त्याच्याजवळ १९२ देशी दारूचे बॉटल, ४ पेटी, किंमत १३४४० रुपये व मोटार सायकल क्रमांक MH 29 DK 1638, ही ५० हजाराची मोटरसायकल, असा एकूण ६३४४० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदरची कार्यवाही एपीआय सुजाता बनसोड यांचे मार्गदर्शनात, पीएसआय शिवाजी टिपूरणे, बीट जमादार मोहन चाटे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव, प्रवीण जाधव यांनी केली. पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करीत आहे.