बिटरगाव पोलिसांची अवैध रेती तस्करावर धाड. तब्बल ५ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त.

बिटरगाव पोलिसांची अवैध रेती तस्करावर धाड.
[तब्बल ५ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त.]
ढाणकी / प्रतिनिधी :
कर्तव्यदक्ष ठाणेदार सुजाता बनसोड यांचे, बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अवैध धंद्यावरील धाडसत्र सुरूच.
मोठ्या अवैध गुटख्यावरील धाडीनंतर, अवैध देशी दारूच्या वाहतुकीवरील धाड तद्नंतर लगेच अवैध रेती तस्करावर धाड. यामुळे ढाणकी व परिसरातील अवैध धंदे वाल्यांची आता काही खैर नाही. यामुळे सामान्य नागरिक मात्र खूप आनंदी आहे. अवैध धंदेवाले मात्र दुखी असून, “कही खुशी,कही गम” असे चित्र सध्यातरी ढाणकी परिसरात पाहायला मिळत आहे.
बिटरगाव पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. १४ जुलै रोजी, वैभव विठ्ठल गव्हाळे रा. पिंपळवाडी ता. उमरखेड हा अवैध रेती वाहतूक करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील, फार्मट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर, नंबर MH 29 BV 1117, त्याला जोडून असलेली निळ्या रंगाची ट्रॉली, असे ५५०००० रु. व ट्रॉली भरून असलेली रेती ६००० रुपये असा एकूण ५ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुजाता बनसोड, बीट जमादार गजानन खरात, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता कुसराम, मुंडे यांनी केली.
Very interesting points you have mentioned, regards for posting.Blog monry