ढाणकी येथील तीव्र पाणीटंचाई उपायोजना लवकर करा अन्यथा चक्काजाम आंदोलन

youtube

ढाणकी येथील तीव्र पाणीटंचाई उपायोजना लवकर करा अन्यथा चक्काजाम आंदोलन

ढाणकी

ढाणकी येथील वर्षानुवर्षाचा पाणीटंचाई ही तीव्र समस्या ढाणकी करांना सतवत आहे. त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी ,मनसे, शिवसेना युवासेना ,प्रहार ,राष्ट्रवादी काँग्रेस, बजरंग दल यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज ढाणकी नगरपंचायत यांना निवेदन प्रत्यक्ष रुपी दिले निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली. 12 विकास कामे होत नसल्याने ढाणकी नगरपंचायत चा दर्जा रद्द करून पुन्हा ग्रामपंचायत ची मान्यता देण्यात यावी, ढाणकी शहरात उद्भवलेली पाणीटंचाई तात्काळ दूर करून पैनगंगा नदीवरून येणारी पाणीपुरवठा योजना सुरू करणे, भविष्यात तीव्र पाणी टंचाई होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना आखणे, शहरातील चिखलमय रस्ते तत्काळ दुरुस्त करणे, बंद असलेली तत्काळ पथदिवे सुरू करणे, शहरातील हातपंप तत्काळ सुरू करणे, शहरातील प्रत्येक प्रभागात नव्याने हातपंपाची निर्मिती करणे, घरकुलाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावणे नगरपंचायतच्या विविध दाखल्यासाठी घेण्यात येणारी घर टॅक्स पावती वसुलीची अट शिथिल करून जन्ममृत दाखल्यासाठी शोधांची नियुक्ती करणे, नगरपंचायत चा पूर्ण वेळ मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांची तात्काळ नियुक्ती करणे, शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला जबाबदार असलेल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे, कचराकुंडी प्रत्येक प्रभागात लावणे ह्या मागण्या नगरपंचायत प्रशासनाने आम्ही लेखी स्वरूपात देऊन मंजूर न केल्यास नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात मुख्य रस्त्यात चक्काजाम करून ते आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!