youtube

महात्मा फुले विद्यालय जिल्ह्यात अव्वल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान

 

११ लाखाचे जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक

उमरखेड :- यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज द्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या अभियानांतर्गत सहभाग घेऊन सन 2024 – 25 करिता खाजगी व्यवस्थापन गटातून विद्यालयाने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अनोख्या अभियानामध्ये विद्यालयाने सक्रिय सहभाग नोंदवून घवघवीत यश प्राप्त केले.शालेय शिक्षण विभाग यवतमाळद्वारा आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड , जिल्हा परिषद यवतमाळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की , शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. जयश्री राऊत , प्राथमिक शिक्षणाधिकारी मिश्रा साहेब यांच्या हस्ते जसराज ओबेराय या ठिकाणी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन संस्थेचे सचिव डॉ. या. मा. राऊत , विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद ना . देशमुख, पर्यवेक्षक सुरते व सर्व शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले .
शाळेच्या भौतिक व गुणवत्तात्मक विकासासाठी शासनाने राबविलेल्या या अभियानासाठी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यवेक्षक दिलीपराव सुरते यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवून विद्यालयाला प्रगतीच्या शिखराकडे अथक परिश्रम घेऊन यश प्राप्त केले. तसेच या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून सुरेंद्र बोरकुट व कनिष्ठ लिपिक आशिष कांबळे यांनी सर्व तांत्रिक आणि सूक्ष्म परीक्षणातून तसेच अभियानासाठी यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर , सचिव डॉ. यादवराव राऊत तथा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व याही पुढे भविष्यात शाळेला उज्वल प्रगतीच्या शिखराकडे नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला व या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या अभियानासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!