उमरखेड तालुक्यातील विविध समस्या बाबत काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ( नागरिकांच्या समस्या बाबत काँग्रेसचा एल्गार )

youtube

उमरखेड तालुक्यातील विविध समस्या बाबत काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

( नागरिकांच्या समस्या बाबत काँग्रेसचा एल्गार )

उमरखेड :- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी यासह छत्रपती शिवरायांचा पुतळा ,वीज , सिंचन ,महागाई ,जलजीवन मिशन यासह तालुक्यातील अनेक समस्या संदर्भात काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस तातूजी देशमुख व साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आले .
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ,स्वामीनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव द्यावा ,चना व तुरीची नाफेडमार्फत खरेदी करावी , छत्रपती शिवराय च्या पुतळ्याचे त्वरीत उद्घाटन करावे ,विद्युत पुरवठा 24 तास उच्च दाबाने देण्यात यावा ,ईसापुर धरणातील पाणी नदीपात्रात नियमित सोडण्यात यावे ,महागाईला नियंत्रणात ठेवून सामान्य लोकांना न्याय द्यावा ,लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात यावे ,जलजीवन मिशनचे कामे त्वरित करण्यासाठी निधी उपलब्ध करावा ,पदभरती प्रक्रिया राबवून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा ,उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावे , ढानकी शहरातील पाणीटंचाई दूर करण्यात यावी ,देवसरी – धोत्रा व चातारी – दिघी पुलाच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,तालुक्यातील चालगणी साखरा खरुस लोहरा कारखेड देवसरी दिघडी उंचवडद चातारी वितरीकेचे काम पूर्ण करण्यात यावे ,खरूज परजना ब्राह्मणगाव रस्त्यावरील कालवा पुलाचे काम करण्यात यावे ,पुराच्या वेढ्यात सापडणाऱ्या देवसरी ते चातारी रोडवरील पुलांची उंची वाढवण्यात यावी यासह तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भात सुद्धा काँग्रेसने सा बा विभागाचे उपअभियंता प्रमोद दुधे यांना निवेदन दिले .
सदर निवेदन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तातूजी देशमुख व साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे ,शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल , महिला तालुकाध्यक्ष सूर्यकांता दिंडाळकर , पूजा अंबादास धुळे ,महेंद्र कावळे ,बाळासाहेब चंद्रे पाटील , खाजाभाई कुरेशी , किशोर ठाकूर , सोनू खतीब , अभिजीत पाईकराव ,रामराव गायकवाड ,आनंद पोपुलवाड , डॉ. संजय माने , वीरेंद्र खंदारे, मंचकराव चव्हाण ,भैय्यासाहेब देशमुख , शेख इरफान , प्रेमराव वानखेडे ,कल्याणराव राणे सह तालुक्यातील व शहरातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!