ढाणकीत विनापरवाना खताची अवैध विक्री; १५ लाखांच्या ट्रकसह खताचा साठा जप्त [बिटरगाव पोलिसांत गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई.] ढाणकी
ढाणकीत विनापरवाना खताची अवैध विक्री; १५ लाखांच्या ट्रकसह खताचा साठा जप्त
[बिटरगाव पोलिसांत गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई.]
ढाणकी
शेतकऱ्यांची फसवणूक करून अनधिकृतपणे आणि विनापरवाना खताची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून, तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरखेड व जिल्हा परिषद यवतमाळच्या कृषी पथकाने ढाणकी येथे एका १६ चाकी ट्रकवर धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४२,००० रुपये किमतीच्या ७०० खताच्या गोण्या आणि अंदाजे १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) राजेंद्र आनंदराव डोंगारे यांना १५ मे २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, ढाणकी येथील उमरखेड रोडला लागून असलेल्या धनंजय मिटकरे यांच्या शेतात राजस्थान पासिंगचा एक मोठा ट्रक (क्रमांक RJ 07 GE 3591) उभा असून त्यामधून अनधिकृत खताची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने तातडीने संयुक्त पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली.
ट्रकमध्ये उपस्थित चालक जगदीशप्रसाद भिन्याराम तरड (वय ३१) व हेल्पर रामप्रताप मगराम कुलरीया (वय ५१, दोन्ही रा. बिकानेर, राजस्थान) यांची पंचांसमक्ष चौकशी केली असता, ट्रकमध्ये ‘GYP Gold जिप्सम पावडर’ नावाच्या ५० किलो वजनाच्या एकूण ७०० गोण्या (३५ मे. टन) आढळून आल्या. या खताबाबत वैध बिल किंवा ई-वे बिल चालकाकडे आढळले नाही. तसेच वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. सदर खत संशयास्पद वाटल्याने कृषी पथकाने खताचे नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
याप्रकरणी कृषी अधिकारी डोंगारे यांच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बीएनएस २०२३ (BNS 2023) कलम ३१८ (४), ३(५) सह रासायनिक खते (नियंत्रण) आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*चौकट :*
*ढाणकीतील कृषी केंद्रांची चौकशी करण्याची मागणी; घरगुती गोदामांत ‘एक्सपायरी’ औषधांचा साठा?*
या मोठ्या कारवाईनंतर ढाणकी परिसरातील खत आणि औषध विक्रीचा काळाबाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कृषी विभागाने केवळ अशा बाहेरील गाड्यांवरच नाही, तर ढाणकी शहरातील स्थानिक कृषी केंद्रांवरही तात्काळ छापे मारून रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके, लिक्विड स्वरूपातील औषधे आणि साठवणूक केलेले बियाणे याची चौकशी करणे गरजेचे बनले आहे.
अनेक कृषी केंद्र चालक कारवाईच्या भीतीने आपल्या मूळ दुकानात किंवा गोदामात साठा न ठेवता, थेट स्वतःच्या घरात ‘एक्सपायरी’ (मुदत संपलेली) झालेली घातक औषधे लपवून ठेवत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. हा एक्सपायरी साठा नंतर छुप्या मार्गाने शेतकऱ्यांच्या माथी मारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ? त्यामुळे कृषी विभागाने ढाणकीतील संशयास्पद कृषी केंद्र चालकांच्या घरांचीही झडती घ्यावी, अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.




Haave youu ever considered about including a lkttle bbit
moe than jut ykur articles? I mean, whwt youu say iss valuablpe annd everything.
Neveftheless imagine if youu addfed some grea iimages or videeo clios
tto gife our possts more, “pop”! Yoour conttent is exxellent bbut with images and
videos, this website could certaily be oone of thee greatest iin itss niche.
Goood blog!
My homepagge … desixxx.biz
Thiss iss a topic that’s close tto my heart…
Thaank you! Exaactly where aree ypur contact drtails though?
Herre iss my page … roloxxx.com
It iss erfect time too mae a ffew pkans forr thhe long run annd it iis time to bbe happy.
I havee redad thiis pput uup andd iif I could I wish to reommend yoou feww attention-grabbing issues orr tips.
Mahbe youu caan write shbsequent artidles rreferring tto thgis article.
I wanmt too rread even more thijngs aabout it!
my blo – txxxvideos.com
Do youu have a spa probleem oon thos website;
I also amm a blogger, andd I wwas wanting too knw ylur situation; wwe havge developdd some nice prohedures
andd wwe aree loojing too tradee solutions wkth other folks, whyy nnot
shoo mee aan email iif interested.