दिपावली निमित्त सुट्टीवर आलेल्या भारतीय सैनिकांचा सन्मान घरी जाऊन साईप्रसाद स्वंयसेवाकाकडुन.
दिपावली निमित्त सुट्टीवर आलेल्या भारतीय सैनिकांचा साईप्रसाद स्वयंसेवकांकडुन घरी जाऊन सन्मान
बरडशेवाळा ता.१९ ( बातमीदार ) आज आपण आपल्या जिवनात सण उत्सव कार्यक्रम सर्व जण जिवन सुखी समाधानाने जगत असलेले मुख्य कारण म्हणजे दिवस रात्र भारतीय सिमेवर आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय जवानामुळेच.भारतीय सैनिक सणवार,आपला परीवार सोडुन देशसेवेसाठी कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी निमित्ताने नांदेड येथील साईप्रसाद परीवाराकडुन दरवर्षी सैनिक गौरव सोहळा आयोजित केला जातो.गेल्या वर्षी हदगाव तालुक्यात सर्वाधिक तेवीस सैनिक पळसा येथे असल्याने पळसा येथे सैनिक गौरव सोहळा पार पडला होता.पण या यावर्षी कोरोना आजारामुळे कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याने दिवाळी सुट्टीवर आलेले भारतीय सैनिकांचा सन्मान नांदेड येथील साईप्रसाद परीवाराकडुन सैनिकांच्या घरी जाऊन करण्यात येत आहे.
हदगाव तालुक्यात निवघाबाजार येथील साईप्रसाद स्वयंसेवकांनी निवघाबाजार येथील सैनिक संदिप देशमुख यांचा सन्मान पोलिस उपनिरीक्षक फोलाने व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत पंधरा रोजी शाल श्रीफळ देऊन गौरव केला.तर पिंपरखेड येथील सैनिक रामा बोधने यांचा सन्मान देऊन गौरव केला.
तर पळसा येथे सोमनाथ नरवाडे, संजय मस्के,शेलेद्रं निमडगे,संदीप मुळे, बालाजी चव्हाण, गजानन जाधव हे सहा सैनिक दिपावली निमित्त घरी असल्याने त्यांचा साईप्रसाद स्वयंसेवकांनी घरी जाऊन कुटुंबासोबत शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.साईप्रसाद परीवाराच्या कार्याचे सुट्टीवर आलेले भारतीय सैनिक पळसासह हदगाव तालुक्यात कौतुक व्यक्त केले जात आहे.
यावेळी दिपकराव पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक हदगाव येथील स्वयंसेवक राजु पांडे, प्रभाकर दहीभाते, उपस्थित होते.