वाहतूक नियंत्रण उपशाखेचे उदघाटन उमरखेड येथे.
*उमरखेड येथे नव्याने वाहतूक नियंत्रण उपशाखेचे शाखेचे उद्घाटन*
उमरखेड
अपघाताने होणारे मृत्यूचा दर झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्र हा अपघाताच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 26-10-2020 च्या रस्ता सुरक्षा संदर्भातील आदेशाने जिल्हा वाहतूक शाखेचे विकेंद्रीकरण करून उपविभाग स्तरावर नवीन वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड येथे एसडीपीओ कार्यालयाच्या बाजूला नवीन वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाला उपविभागीय अधिकारी आदरणीय स्वप्नील कापडणीस साहेब तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड श्री वालचंद मुंडे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणन पोलीस निरीक्षक संजय चौबे साहेब, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे साहेब, नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी चारुदत्त इंगोले साहेब उपस्थित होते. वाहतूक नियंत्रणासाठी आतापर्यंत 16 पोलिस अंमलदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी केले. तर सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत आभार वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक सतीश खेडेकर साहेब यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.