चिरंगवाडी च्या जंगलात नीलगाई ची शिकार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आरोपींना सोडल्याने विविध चर्चेला उधाण
*चिरंगवाडी च्या जंगलात नीलगाई ची शिकार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आरोपींना सोडल्याने विविध चर्चेला उधाण*
उमरखेड
येथील वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या रंग वाडी मधील पोफाळी राऊंडमध्ये निलंगायची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून गोपनीय माहिती च्या द्वारे घटनास्थळावर पोहोचलेल्या क्षेत्र सहायक वनरक्षक यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने खळबळ उडाली आहे.वन कर्मचाऱ्यांचे मारहाण करणाऱ्या आरोपींना वन परिक्षेत्र अधिकारी यांनी परस्पर सोडून दिल्या चर्चेने वन वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिरगवाडी जंगलात परिसरात निलंगायची शिकार झाल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी शेत्र सहाय्यक संतोष संघई यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर दोघेही घटनास्थळावर गेले असता त्या ठिकाणी 100 मीटर शिकारी मटन शिजत असल्याचे दिसले सदर घटनेचा पंचनामा करत असताना तेथील उपस्थित आरोपींनी हल्ला करून जखमी केले.याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांनी पुसद येथील फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांना दिली.यावेळी फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्रअधिकारी घटनास्थळी दाखल झाले परिक्षेत्र अधिकारी येथे दाखल केले सदर घटना गंभीर असताना देखील उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कोर्टात दाखल न करता संशयितस म्हणून सोडून दिले .जीवाची पर्वा न करता वन कर्मचाऱ्याच्या आरोपींना पकडले असतानादेखील त्यांना सोडून देण्यात आल्याने याबाबत वन वर्तुळात विविध चर्चेला पेव फुटले आहे. वनकर्मचारी राजू सुतार यांनी पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गजानन मारुती किरंगे व भुतकर यांच्यासहित अज्ञात आरोपी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार भगत करत आहे. चिरंगवाडी येथे घडलेल्या घटनेच्या क्यूआर फाडक्यात आलाळ असून वन कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची फिर्याद पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे सदर आरोपी मारहाण प्रकरणातील असून कर्मचाऱ्यांच्या शिकार प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल अशी मारहाण करणारे आरोपी संशयित असून त्यांना तपासा दरम्यान हजर राहण्याचे आदेश देऊन सोडून देण्यात आले .