निवघाबाजार येथील सुरेखाच्या विवाहाला व्यापाराच्या मदतीचा हात व आशा ग्रुप

youtube

निवघाबाजार येथील सुरेखा च्या विवाहाला व्ययापाराच्या मदतीचा हात.
निवघाबाजार…

येथील कैलास पाईकराव यांचे आपरेशन झाले असल्याने ते कोणतेही काम करु शकत नाहीत पत्नी बेबीताई रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करत असताना सुरेखाचा विवाह जुळला अठरा मे रोजी छोटेखानी विवाह पार पडणार आहे. आठ दिवस बाकी असताना घरच्या परिस्थितीमुळे कन्यादान साहित्य खरेदी शक्य होत नसल्याने निवघाबाजार येथे पत्रकारांनी साईप्रसाद परीवार नांदेड, उद्देश सोशल फाउंडेशन च्या मदतीने अनेक विवाहाला घरपोच कन्यादान साहित्य दिले असल्याने पाईकराव कुटुंबाने येथील सामाजिक कार्यकर्ते बंडु माटाळकर यांच्या कडे आपली व्यथा मांडली…
माटाळकर यांनी आशादिप ग्रुप व निवघाबाजार येथील मोबाईल संदेशांद्वारे आवाहन केले होते. आशादिप ग्रुप ने आपली दरमहा होणारी रक्कम यामध्ये आशादिप ग्रुप चे सदस्य कृषी तंत्र व्यवस्थापक सतीश खानसुळे हदगाव यांनी अडीच हजार रुपये मदत केली.यामुळे जास्तीची भर पडल्याने सुरेखा च्या विवाहाला लागणारे कन्यादान साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
तर या विवाहाला निवघाबाजार येथील व्यापारी मधुकर कदम २१००/, बालाजी कानडे १००१/, गजानन पाटील मनुलेकर १००१/, दिलीप नवसागरे ५०१/ सारीका साडी सेंटर ५०१/संदिप इलेक्ट्रॉनिक्स ५०१/,मारोती कदम ५०१/ , शशीकांत माटाळकर ५०१/, विलास मानकरी ५०१/, सदाशिव कदम ५०१/ शेख इरफान शिरड, राजेंद्र जाधव तळणी, अशोक पाईकराव , शरद कदम, शिवाजी ठोसरे, शिवाजी कुदळे, संजय वाघमारे, संतोष कदम, यांनी आपले योगदान दिले असल्याने सुरेखा यांच्या विवाहाला लागणारे संसार उपयोगी भांडी व अन्न धान्य मदत खरेदी करून ता. अकरा मे रोजी पाईकराव यांच्या घरपोच साहीत्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमाचे निवघाबाजार सह परीसरात कौतुक व्यक्त केले जात आहे. यावेळी हरिश्चंद्र चिलोरे, प्रभाकर दहिभाते, रामेश्वर बोरकर, देविदास कल्याणकर, गजानन कदम, सुदर्शन कऱ्हाळे, संतोष कदम उपस्थीत होते…

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!