पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमाने राज्यभर साजरी करणार – प्रकाश सोनसळे.
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमाने राज्यभर साजरी करणार –
प्रकाश भैय्या सोनसळे
बीड …
दि.29-मे
कोरोना चा कहर संपता संपत नाही. आणि टाळेबंदी तर वाढतच चालली आहे. दिवसेंदिवस संसर्गजन्य व रुग्ण वाढत असतांना घरात राहणे हा संसर्गाला रोखण्याचा पर्याय आहे.
त्यामुळे शासनाने विविध देवस्थाने बंद केली आहे, म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची,31मे ला 296 वी जयंती आपण घरातच अतिउत्साहाने साजरी करावी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी ही सर्व धनगर समाजाची आराध्यदैवत आहे. या जयंती च्या दरम्यान आपल्या घरावर शक्य होईल तर पिवळे झेंडे लावायचे आहे. पोलीस डॉक्टर व साफसफाई कर्मचारी यांचे स्वागत करायचे आहे. ज्याला शक्य होईल त्यांनी मेंढपाळ बांधवांना मदत करून लसीचे महत्त्व पटवून द्यायचे आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने विविध उपक्रमाने राज्यभर साजरी करा असे आवाहन मा.प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती यांनी केले.
राष्ट्रमाता राजमाता, अहिल्यामाई होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त धनगर समाज युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मनोज सिराम सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वरिष्ठ पदाधिकारी सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे प्रदेशाध्यक्ष मा.विनोद अण्णा खेमनार राज्यमुख्य सचिव ज्ञानेश्वर मुखमाले प्रदेश उपाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा माने मार्गदर्शक मा.भिमराव नाना शिंगाडे प्रदेश सरचिटणीस मा. बालाजी नारे प्रदेश कार्याध्यक्ष मा.मधुकर हिरे कार्याध्यक्ष मा.गणेश पळसकर सहसरचिटणीस मा.संभाजी देवकते महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.बालाजी काकडे युवा अध्यक्ष सचिन बिटेवार विदर्भ अध्यक्ष मा.प्रल्हाद सोरमारे विदर्भ उपाध्यक्ष मा.उमेशभाऊ कुरवाडे विदर्भ युवा अध्यक्ष मा.विष्णुभाऊ साखरे विदर्भ युवक कार्यध्यक्ष मा. रविंद्रजी कष्टे मराठवाडा अध्यक्ष मा.वैजनाथ पावडे महिला प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई आजगे. प्रदेश कार्याध्यक्ष सौ. रेखाताई देवकते महाराष्ट्र राज्य निरीक्षक मा. नानासाहेब कायगुंडे मराठवाडा नेतृत्व मा.महादेव राहिंज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब बीडगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.दिपक चोरमले मराठवाडा युवक अध्यक्ष मा.उध्दव कोळेकर, डॉ.किरण सोनसळे, नामदेव पारखे, पांडुरंग यमगर, समाधान सिराम,सचिन पांढरे,बबलु सिराम, रामनाथ टकले आदी