पुलाची उंची वाढविण्यासाची ग्रामस्थांची मागणी.
पुलाची उंची कमी असल्यामुळे, कोप्रा व कृष्णापूर ग्रामस्थांची वाढली डोकेदुखी
[पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी]
उमरखेड(प्रतिनिधी)
दि.21_जुलै
*विवेक जळके*
आज दि.21 जुलै रोजी, संततधार पावसामुळे उमरखेड तालुक्यामधील कोप्रा (कृष्णापुर),गावाला लागून असलेल्या नाल्याला चांगलाच पूर आल्याने कृष्णापुर व कोप्रा या गावातील नागरिकांचा दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता.
पूर कमी होईपर्यंत गावातील दोन्ही बाजूचे नागरिक पाण्याची पातळी कमी होईपर्यंत रोडवरती ताटकळत उभे होते,व त्या रोडणी जाणारे येणारे वाहन सुद्धा बरेच वेळ थांबून होते, सुमारे एक ते दोन तासानंतर पुलावरून पाण्याची पातळी कमी झाली, तेव्हा दोन्ही बाजूचे नागरिक आपल्या गावात सुरळीत घरी पोहोचले, दोन्ही गावच्या नागरिकांनी काही काळ खूप संताप व्यक्त केला.
पूल बांधण्यासाठी दोन्ही गावकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी आहे,या पुलाबाबत दोन्ही गावच्या नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाला तसेच लोकप्रतिनिधींना पुलाची दुरुस्ती तसेच उंची वाढविण्याबाबत लेखी तोंडी सूचना दिल्या परंतु अद्याप पर्यंत त्यांच्या मागणी तसेच सूचनेला यश मिळाले नाही.उलट त्यांच्या मागणीला संबंधित विभागणी वाकुल्या दाखविण्याचे काम केले असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जाते.
या पुलाची अत्यंत डोकेदुखी वाढली आहे,पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला की दोन्ही गावाचा संपर्क तुटतो आणि संपर्क तुटल्यामुळे नागरिक तसेच शाळकरी मुलांना सुद्धा या पुलाचा प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो,अनेकदा पावसाळ्यात कधी कधी रात्रीच्या सुमारास या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना आपल्या हक्काच्या गावात जायला त्रास होतो.
त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी संबंधित विभागाने आता तरी, लक्ष घालून लवकरात लवकर पूल बांधून द्यावा,अशी कोप्रा व कृष्णापुर येथील ग्रामस्थ मागणी करत आहे.