अमडापुर धरणग्रस्तांना तत्काळ मोबदला दया.
अमडापूर धरणग्रस्तांना तात्काळ मोबदला द्या.
उमरखेड{प्रतिनिधी}
दि.8ऑगस्ट
उमरखेड तालुक्यातील अमडापूर लघु प्रकल्प ग्रस्त शेतकरी अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे.
हक्काची शेती असली तर ती कुटुंबाला कधी उपाशी निजू देत नाही,एवढे सामर्थ्य त्या जमिनीच्या तुकड्यात असते परंतु हिच हक्काची जमीन हिरावून घेतली तर डोक्यावरचं छत हिरावल्यासारखे होते.
आणि शेत मालकावर दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करण्याची वेळ येते एकेकाळी जमिनीचा मालक असलेला शेतकरी
शेतमजूर होतो,तेव्हा त्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे हा प्रश्न निर्माण होतो.
उमरखेड तालुक्यातील अमडापूर लघु प्रकल्प मागील वीस वषार्पासून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या पण आज पर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही आणि शेती सिंचनाला पाणीसुद्धा काही परिसरामध्ये मिळालेला नाही.
काही ठिकाणी नुसते कालवा खोदुन ठेवले आहे,बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेच नाही,जिल्हा प्रशासनाकडून व राज्य शासनाकडून अमडापूर लघु प्रकल्पाच्या संबंधित अमदापूर प्रकल्पांतर्गत कुरळी गावचे स्वच्छता पुनर्वसन 340 कुटुंबाचे पुनर्वसन करावे सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकार्यालय यवतमाळ येथे कुरळी गावातील महिला पुरुष व बालकांना घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे उपोषण साठी बसणार आहेत.