चातारी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
चातारी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम मोफत आरोग्य तपासणी.
उमरखेड..
केंद्रे माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार माजी आमदार विजयराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चातारी येथे भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन काल दिनांक 12 डिसेंबर रोजी चातारी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली देऊन तसेच देशाची तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे व त्यांची पत्नी व इतर 11 सैनिकाचे अपघातांमध्ये मरण पावले त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय माने यांनी कोरोना काळात आपल्या डॉक्टरांचे महत्त्व काय असते हे कळले आणि त्याचाच एक भाग म्हणून चातारी ,ब्राह्मणगाव, परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या आरोग्य विषयाच्या समस्या जाणून घेण्याचा मनोदय यावेळी डॉ. विजय माने यांनी व्यक्त केला. या शिबिराचे उद्घाटन डॉ. आनंत सूर्यवंशी यांनी आरोग्याची काळजी घेताना सकस आहार व्यवसाय व्यायामाचे महत्त्व आणि त्या विषयी असलेली सर्वसामान्य शहरी व ग्रामीण जनतेचे अज्ञात याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिरात अनेक तज्ञ डाँ. रुग्णांची मोफत तपासणी करण्यासाठी उपलब्ध होते. यामध्ये डॉ. अनंत सूर्यवंशी, डॉ. प्रशांत भट्टड, डॉ. विवेक पत्रे डॉ. वीरेंद्र कदम ,डॉ गोपाल चव्हाण ,डाँ दीपक देशमुख डॉ नाकुल पिंपरखेड, डॉ. राजेश माने, डाँ दीपक माने, विठ्ठल माने, सचिन माने आदी शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी केली या शिबिरात चातारी, बोरी, कोपरा, उंचवडद ,दिगडी, आदी परिसरातील एकूण 983 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आरोग्याची तपासणी केली या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वत्र उपकरण सर्वत्र चर्चा आहे. सदर शिबिराचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध पाटील, बाळासाहेब काळे, काशिराम पाटील, विठ्ठलराव काळे, रवीभाऊ शिलार, डॉ. बाळासाहेब गोविंद्वार, भाऊराव माने, बापूराव माने, श्रीधर पाटील, शेतकरी संघटनेचे अनिल माने, कल्याण माने, शिवाजी माने ,शिवाजीराव माने, शिवाजीराव पोलीस पाटील, दादाराव पाटील सरपंच सौ रंजना माने, संजय सावंत ,परमात्मा जी गरुडे सरपंच ,राजू वानखेडे डॉ. सतीश हामंद, दीपक राणे, दिगंबर कोल्हे , दशरथ चांदराव माने ,बाबुराव कदम बाबाराव सोनुने, राजु खामनेकर, अजय नरवाडे, गजेंद्र ठाकरे, विष्णू नरवाडे, विष्णूकांत वाडेकर, उपसरपंच अमोल माने, अशोकराव पवार, किसनराव खांडरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिराच्या यशस्वितेसाठी शंकर मेडिकल, गजानन मेडिकल श्रीधर देवसरकर ,बालाजी वानखेडे, महेश राणे ,सुदर्शन राणे, धोडु माने, दिगंबर पवार, आबासाहेब कदम, शुभम कदम, देवानंद चव्हाण, माने पप्पू माने ,गजानन माने, खाजा बाई ,दशरथ नरवाडे, डॉ.चंद्रवंशी ,हमिद पठाण, लक्ष्मीकांत दिलीपराव माने, संदीप मुतेपवार, व सर्व शिक्षक बांधव गोपीनाथ मुंडे जयंती समिती तसेच समस्त गावकरी मंडळी चातारी यांनी मोलाचे सहकार्य केले.