डॉ .धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा नागरिकांचा जन आक्रोश मोर्चा उमरखेड.
डॉ. धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला अटक करा : नागरिकांचा जनआक्रोश मोर्चा
मुख्य आरोपी अजूनही पसारच : प्रशासना समोर मोठे आव्हानच
डॉ. धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांची सी.बी.आय. चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी उमरखेड :
दि. ११जानेवारी रोजी साकळे शाळेसमोर भरदिवसा गोळ्या झाडून डाॅ.धर्मकारे यांची निर्घृण हत्या केली. या घटनेला 15 दिवस होऊन सुद्धा मुख्य मारेकरी मोकाट असल्यामुळे आमदार नामदेवराव ससाने यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले तसेच आज 24 जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढून रोश व्यक्त करण्यात आला. जनआक्रोश मोर्चाची सुरुवात उत्तरवार शासकिय उपजिल्हा रुग्णालय प्रांगणातून करण्यात आली. व मोर्चा छञपती शिवाजी महाराज चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जनआक्रोश मोर्चेत विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी उपविभागीय पोलीस कार्यालयात सामाजिक संघटनांशी सुसंवाद बैठक घेतली व शांततेचे आव्हाण केले.
डाॅ.धर्मकारे हे गोर गरीब कुटुंबातील रुग्णांसाठी देवदूतच असल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे, कुठलाही रुग्ण असो त्यांनी उपचार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यांनी पैश्याला कधीही महत्व दिले नाही. परंतू अश्या व्यक्तीवर दिवसा ढवळ्या चार गोळ्या झाडल्या यामुळे संपूर्ण डाॅक्टर हादरले. या घटनेचा निषेध करत जोपर्यंत मुख्य सुत्रधार सापडत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असे आ.नामदेवराव ससाने यांनी सांगीतले.
डाॅ.धर्मकारे साहेबांसाठी सर्व समाजाने एक होत रस्त्यावर उतरून मुख्य आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली. यावेळी आ. नामदेव ससाने यांच्या नेतृत्वात सर्व सामाजिक संघटना , डॉक्टर असोसिएशन . व्यापारी संघटना व सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks.