शिक्षणा पासुन आपली मुले मुली दूर ठेवू नका – शरद माळशिकारे
शिक्षणापासून आपले मुले मुली दुर ठेऊ नका आपले मुले घडवा -शरद माळशिकारे
बीड..
अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे..
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा तेरावा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत
बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.श्री. शरद माळशिकारे साहेब तुरूंगाधिकारी बीड कारागृह , यांच्या शुभहस्ते करण्यात आले
व राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजन मा श्री.अशोक पांढरे, आबुज सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले
आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास संबोधित करताना मा.शरद माळशिखारे साहेब म्हणाले अभिवादन सभा मध्ये समाजाने पुढे येऊन सहभागी झाले पाहिजे .आज आपल्या समाजातील मूले ,मुली शिक्षणापासून दूर राहणार नाहीत याची काळजी घ्यावी आपला मुलगा, मुलगी यांचे शिक्षण उच्चशिक्षित झाले पाहिजे मुले,मुली अधिकारी, तहसीलदार , डॉक्टर ,पोलिस, तलाठी,ग्रामसेवक झाले पाहिजे शिक्षण घ्या व आपले मुले घडवा ही काळाची गरज आहे
अभिवादन सभा प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सुरू केली त्याचा लाभ समाजाने घेतला पाहिजे दर रविवारी आपले दैवत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपन सर्वांनी अभिवादन केलेच पाहिजे असे मा.अशोक पांढरे साहेब यांनी सांगितले.
यावेळी ,अशोक पांढरे महादेव राहींज, सचिन ठेंगल, सोमनाथ लंबाटे,अमर वाघमोडे,आबुज सर ,पवन गावडे, महानोर साहेब, मनोज चवरे,करण भोंडवे, आदित्य बनकर आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक (पुजा) व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा पूजन अभिवादन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://accounts.binance.com/bg/register?ref=OMM3XK51