कुसुमताई चव्हाण महिला भूषण माहेश्वरी राठोड यांना पुरस्कार जाहीर.
कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार माहेश्वरी राठोड यांना जाहीर
एबीपी माझाच्या मनश्री पाठक व संपादीका सोनल खानोलकर यांना जाहीर.
नांदेड,(प्रतिनिधी)
-दरवर्षी जागतीक महिला दिनी देण्यात येणारा कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार मुंबईच्या नामवंत व्यावसायीक माहेश्वरी राठोड यांना तर एबीपी माझाच्या मनश्री पाठक व संपादीका सोनल खानोलकर यांना जाहीर झाला असून दि.8 मार्च रोजी दिला जाणारा पुरस्कार कोरोनाचे नियम संपूर्णपणे शिथील झाल्यानंतर तारीख निश्चीत करण्यात येणार असल्याचे संपादक रूपेश पाडमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी जागतीक महिला दिनी विविध क्षेत्रात करणार्या महिलांचे प्रोत्साहन वाढवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार, सामाजीक पुरस्कार व विशेष सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात येतो. यंदाचे हे तेरावे वर्ष आहे.
मागील अनेक वर्षापासून आपल्या गुणवत्तापूर्वक बांधकाम व्यवसायातून आपली ओळख निर्माण करणार्या मेट्रो सिटीच्या सीएमडी माहेश्वरी राठोड यांना महिला भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सातत्याने नवनवीन विषय हाताळून आपली गुणवत्ता आणि कर्तृत्वाची चमक दाखवणार्या एबीपी माझाच्या मनश्री पाठक व मागील 28 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असताना सामाजीक कार्यात अग्रेसर असणार्या खतरनाक व मनातील जाणीव या नावाने दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत सातत्याने देणार्या संपादीक सोनल खानोलकर यांना सामाजीक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या कार्यातून नावलौकीक मिळवणार्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येतो. त्यात यंदा दिल्लीचा पुरस्कारासह विविध पुरस्काराने सन्मानीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व असणार्या हदगांवच्या श्रीमती रतन कराड, गावाच्या विकासासह परिसरातील जनतेच्या प्रश्नावर पतीसोबत अहोरात्र परिश्रम घेणार्या उदगीर तालुक्यातील वाईगाव येथील सौ.संध्या जांभळे, कला व साहित्य क्षेत्रातील नामवंत सौ.स्वाती देशपांडे, शैक्षणीक कार्य व लिखाणात नावलौकीक असणार्या सौ.मंगल फुलारी, अखील भारतीय ब्राम्हण महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदावरून सातत्याने समाजपयोगी कार्य करणार्या सौ.प्रिती वडवळकर, नुकताच शासनाचा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त अर्धापूरच्या सौ.जयश्री वागरे, उपक्रमशील व्यक्तीमत्व असणार्या शिक्षीका सौ.सुवर्णा कळसे, राजकीय कार्यात अग्रेसर राहून समाजसेवा करणार्या किनवटच्या सौ.प्रिती मुनेश्वर, लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परिश्रम घेणार्या हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील सौ.अश्विनी शिंदे, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मेहनत घेणार्या लोहा तालुक्यातील पोलीसवाडीच्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ.अनिता धुळगंडे, शिक्षण क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणार्या गुरूगौरव पुरस्कार प्राप्त हदगाव तालुक्यातील पळसा येथील जागृती पासंगे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सदरील पुरस्कार सोहळ्यासाठी मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, सरवर खान, सौ.संगीताताई बारडकर, सौ.जयश्री राठोड, सौ.सविता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ.अरूणा पुरी, सौ.प्रणिता भरणे, शिवहरी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख परिश्रम घेत आहेत.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://accounts.binance.com/lv/register-person?ref=GJY4VW8W