उमरखेड येथे जागतिक महिला दिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा.

youtube

उमरखेड येथे जागतिक महिला दिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा.

‘ठिकठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसादात नारिशक्तीचा सन्मान..!’

उमरखेड..
तालुक्यातील विविध ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून नारिशक्तीच्या गौरवशाली कार्यास उजाळा देताना उत्स्फुर्त प्रतिसादात नारिशक्तीचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आज दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमरखेड येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्षेत्रात वावरणाऱ्या तसेच उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान उमरखेड येथील पार्वती ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्षेत्रात कार्यरत महिला भगिनींचा सन्मान सन्मान चिन्ह तसेच एक रोपटे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तर आदर्श बहुउद्देशीय संस्था उमरखेड यांच्या वतीने विशेष सन्मान सोहळा आयोजित करताना समाजकार्यासाठी स्वत:ला झोकून देवून जनतेसाठी अतुलनीय सेवा कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना कोरोना योध्दा म्हणूनही सन्मानित केले. विशेष म्हणजे यावेळी स्त्रीशक्तीच्या उत्थानासाठी संकल्पित केलेल्या विविध उपक्रमांतर्गत अनेक संकल्प राबवण्याच्या विविध उपक्रमात गरीब मजूर, विधवा, अपंग निराधार व वाटसरूंवर उपासमारीची वेळ येऊ नये. तसेच उमरखेड परिसरात कुणीही उपाशी राहता कामा नये. यासाठी लोकसहभागातून “एक पोळी जास्तीची” या उपक्रमांतर्गत ज्यांनी या उपक्रमात आपला वाटा दिला त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
तसेच इनरव्हील क्लब उमरखेड
यांच्यातर्फेही जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकार महिला व पुरुष यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती…

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!