जागतिक महिला दिनानिमित्त कोरोणाच्या काळात सेवा करणाऱ्या शंभर महिलांचा सन्मान – आदर्श बहुउद्देशीय संस्थाकडुन

youtube

जागतिक महीला दिनानिमित्त कोरोनाच्या काळात सेवाकार्य करणार्‍या शंभर महीलांचा सन्म्मान
उमरखेड..
आदर्श बहुऊद्देशिय संस्था उमरखेड च्या वतीने जागतिक महीला दिनाचे औचित्य साधुन कोरोना संकट काळात संस्थेने राबविलेले “एक पोळी जास्तिची व कोव्हीड रुग्णांसाठी अन्नपाणि मदत मोहीम” या उपक्रमात ज्यां ज्या महीलांनी स्वताच्या हताने स्वयंपाक करुन बेघर,भिकारी,गरीब,गरजु, बाहेर गावुन पायी ये—जा करणार्‍यांना डब्बे पोहचुन अन्नदान केले अशा शंभर महीलांचा “सन्मान स्ञीशक्तीचा” या कार्यक्रमांअंर्गत सन्मानपञ देऊन सन्मान करण्यात आला.
ज्या कोरोनाच्या संकट काळात संपुर्ण जग असताव्यस्त झाले होते, कोव्हीड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व अख्खे कुटुंबच्या कुटुंब क्वारंटाईन असल्याने त्यांच्याकडे आपले सख्ये,नातेवाईक कोणी फिरकतही नव्हते अशा परिस्थित संस्थेच्या टिमने “एक पोळी जास्तीची व कोव्हीड अन्नपाणी मदत मोहीम” या लोकसहभागातुन सुरु केलेल्या उपक्रमाअंर्गत भोजन पुरवण्याचे काम केले. यामध्ये सिंहाचा वाटा स्ञीशक्ता होता. त्यामुळे या महीलांची जाणिव ठेऊन कुठतरी त्यांच्या कार्याची दखल व्हावी,त्यांचा सन्मान व्हावा हाच उद्देश ठेऊन जागतिक महिलां दिनांनिमित्त शंभर महीलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी,वक्त्यानी प्रकाश टाकला. स्ञियांचे अधिकार,कायदा,स्थान,महत्व याविषयावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दामोधर इंगोले,रामदास काळे,प्रशांत ससाणे,मधुकर राठोड,संतोष जळके,राहुल मोहीतवार,अभिजित गंधेवार,केलाश जळके,श्रावण जळके,वैभव कोडगिरवार समाधन भालेराव
या कार्यक्रमाचे अध्यक्षा सरोजताई देशमुख होत्या. तर प्रमुख पाहुने म्हनुन एपिआय सुजाता बनसोड,एसडिओ व्यकंट राठोड,बिडिओ प्रविनकुमार वानखेडे,बिडोओ जयश्री वाघमारे,हे होते.
प्रमुख उपस्थिती आ.नामदेवराव ससाणे यांच्या पत्नी अनुजाताई ससाणे,निधीताई नितीन भुतडा प्रतिभाताई खडसे माजि जि.प. अध्यक्षा,सवाताई कदम,माजी प.सं. सभापती,वानखेडेताई जि.प. सदस्या, अॅड.जयश्री कलंञी,अॅड,अस्मिता आढाव,डिॅ.खुशबु पुरी,डाॅ.मनिषा व्यावहारे,अल्काताई मूडे,शबानाखान,आरेफा अन्सारी,आनंदिदास पाळेकर,जय बेदरकर सर,सुदर्शन रावते पाटील, सर,डाॅ.अंबेजोगाईकर,पञकार सविताताई चंद्रे ,गांजेगावकर, राजुभाऊ गायकवाड,अझरउल्लाखान,विवाध सामाजिक संघटाने पदाधिकारी,व शेकडो महीलां हजर होत्या.
कार्यक्रमाचे संचलन संस्थेचे अध्यक्ष शेवंतराव गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सस्थेचे उपाध्यक्ष सचिव संतोष ससाणे यांनी केले.

Google Ad
Google Ad

1 thought on “जागतिक महिला दिनानिमित्त कोरोणाच्या काळात सेवा करणाऱ्या शंभर महिलांचा सन्मान – आदर्श बहुउद्देशीय संस्थाकडुन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!