लेक महाराष्ट्राची पार्वती ग्रुपचा अभिनव उपक्रम उमरखेड

youtube

लेक महाराष्ट्राची – पार्वती ग्रुप चा अभिनव उपक्रम..
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पार्वतीबाई काशिनाथस्वामी शिरडकर ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरसुळ व्दारा संचलित पार्वती ग्रुप उमरखेड च्या वतीने आयोजित लेक महाराष्ट्राची या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा बसवेश्वर अभ्यासिका उमरखेड येथे करण्यात आले होते. उमरखेड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकुण ६० महिलांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण व औद्योगिक या तीनही क्षेत्रात महिलांना सक्षम बनविणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाानी प्रा शितल बंग तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकृष्ण तिवारी,प्राचार्य फार्मसी काॅलेज उमरखेड,डॉ सारीका वानखेडे सुखकर्ता हाॅस्पीटल, डॉ प्रिती दारमवार गिरीराज हाॅस्पीटल,डॉ गिता विरकर वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र मुळावा, सविताताई चंद्रे मुख्य संपादिका नारीशक्ती चॅनल,नेहा गजानन कापसे , मास्टर आँफ अर्बन अँड रिजनल प्लानिंग एन आय टी काॅलेज भोपाळ,नितीन पुरी व्यवस्थापक उमेद, प्रा साधना देवसरकर, कुसुम गीरी मॅडम, अँड वैष्णवी उन्हाळे, वैशाली धोंगडे, माधुरी दळवी रामदास ईटकरे, पार्वती चॅरिटेबल हाँस्पीटल चे संचालक डॉ विष्णूकांत शिवणकर, कुसुम शिरडकर पार्वती ग्रुप च्या अध्यक्ष रूपाली शिरडकर, उपाध्यक्ष सुप्रिया बिचेवार,वर्षा कदम व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. शितल लढ्ढा रिसर्च सोसायटी उमरखेड व पार्वती ग्रुप उमरखेड च्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिलांना औद्योगिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शितल लढ्ढा व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असून महिलांना याव्दारे ऑनलाईन प्रशिक्षण, तज्ञांमार्फत व्यवसायाबाबत मार्गदर्शन इत्यादी आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शितल सखी मंचाच्या माध्यमातून नोंदणी करून सर्व महिलांना यामध्ये सहभागी होता येईल असे मत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ सचिन लढ्ढा डायरेक्टर इनोव्हेशन अँड ईन्क्युबेशन अँड लिंकेज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर यांनी व्यक्त केले, ते व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी होते. महिलाआरोग्य विषयक वैशाली धोंगडे एकात्मिक समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले, शैक्षणिक विषयी प्रा साधना देवसरकर, सामाजिक क्षेत्रातील महिलांचे स्थान या विषयावर प्रा शितल बंग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित एकुण १८५ महिलांची मोफत आरोग्य तपासणी डॉ सारीका वानखेडे, डॉ प्रिती दारमवार यांच्या हस्ते करून मोफत औषधोपचार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष बिचेवार, प्रास्ताविक बालाजी शिरडकर तर हरिदास इंगोलकर यांनी उपस्थिताचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी कदम,ऋषीकेश, साक्षी शिरडकर, मयूर पुजारी, परमेश्वर शेवाळकर, ओंकार शिरडकर,आश्विनी चंदनकर,रमेश वाघमारे, दिलीप पवार यांनी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

1 thought on “लेक महाराष्ट्राची पार्वती ग्रुपचा अभिनव उपक्रम उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!