डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने प्रो.डॉ. अनिल कांळबांडे सन्मानित.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने प्रो. डॉ अनिल काळबांडे सन्मानित
उमरखेड :
तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा येथील मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ . अनिल काळबांडे यांच्या सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्याचे योगदान लक्षात घेता त्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय . नागपुर येथील दीक्षाभूमीच्या सभागृहात जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने त्यांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले . डॉ . अनिल काळबांडे यांचे साहित्य संशोधन आंबेडकरी चळवळ धम्म क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान व कुठल्याही प्रकारचे योगदान मानधन न घेता महाराष्ट्रभर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे म्हणून ते सर्वाना परिचीत आहे .त्यांचा गौरव स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन जागतिक बौद्ध धर्मगुरू नागार्जुन सुरई ससाई ,जगप्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉ . चंद्रशेखर मेश्राम त्याचबरोबर जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक कुमार खोब्रागडे ,मंगळूर विद्यापीठ कर्नाटकच्या डॉ .सोमा टी रोडनवर , माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, नाबार्ड सहायक महाप्रबंधक सचिन सोनने , उपमहाप्रबंधक डॉ .सुरेश घरडे , शंकर बरडे, सुजितकुमार मुरमारे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा गौरव करण्यात आला . कार्यक्रमाची भूमिका डॉ . गोविंद कांबळे बारामती , प्रस्ताविक डॉ . रवींद्र तिरपुडे सूत्रसंचालन डॉ . विना राउत तर आभार प्रा कल्पना शिंदे यांनी मानले . जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे आठवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रकाशन सोहळा , पुरस्कार सोहळा व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने भव्यदिव्य स्वरूपात कार्यक्रमाची सांगता झाली . या कार्यक्रमासाठी भारतभरातून साहित्यिक उपस्थीत होते .( सोबत फोटो भन्ते सुरई ससाई डॉ काळबांडे यांचा सत्कार करतांना )