अकोली येथील शेतकऱ्याचा धाडसी निर्णय कारखानदार व ऊसतोड कामगाराचा मनमानीला कंटाळून तोडणीसाठी आलेल्या उसात सोडली गुरेढोरे.
कारखानदार व ऊसतोड कामगारांच्या मनमानीला कंटाळून तोडणीसाठी आलेल्या ऊसात सोडली गुरेढोरे….
‘उमरखेड तालुक्यातील अकोली येथील शेतक-यांचा धाडसी निर्णय’
उमरखेड,
तोडणीस आलेला ऊस कारखानदार नेत नाही तर तोडण्यासाठी ऊसतोड कामगार एकरी तब्बल 20 ते 30 हजार रूपये मागून ऊसउत्पादक शेतक-यांस वेठीस धरत असल्याच्या पार्श्वभुमिवर उमरखेड तालुक्यातील शेतक-यांने तोडणीसाठी आलेले तब्बल दोन एकर शेत गुराढोरांसाठी खुले केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
उमरखेड तालुक्यातील मौजे आकोली येथील माजी पोलीस पाटील शेषराव रामसिंग राठोड यांनी चालू हंगामात पाच एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली असून त्यापैकी दोन एकर ऊस तोडणीसाठी आलेला आहे. परंतू तोडणीसाठी आलेला उस कारखानदार घेवून जात नाही. व मजूरांमार्फत तोडणी करण्यासाठी ऊसतोड कामगार एकरी तब्बल 20 ते 30 हजार रूपये मागून वेठीस धरीत असल्यामुळे या प्रकाराला कंटाळून शेतकरी राठोड यांनी चालू हंगामात केलेली पाच एकरातील नवीन लावगण तसेच तोडणीसाठी आलेला दोन एकर असे एकूण ७ एकर उसात गुरेढोरे सोडली असून सर्व उस लागवडीचे क्षेत्र गुराढोरांसाठी खुले केल्याचा धक्कादायक निर्णय घेवून सर्वांनाच अचंबित केले आहे.
दरम्यान कारखानदार व ऊसतोड कामगारांची मनमानी अशीच चालू राहिली तर शेतक-यांस आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नसल्याची खंत शेषराव राठोड यांनी व्यक्त करून आपल्या शेतातील सात एकरात असलेला ऊस कुणाला जनावरांसाठी लागत असेल तर विनामुल्य कापून घेवून जाण्याचे आवाहनही शेषराव राठोड यांनी केले आहे…