चोरट्याचा डाव उधळून लावला पोलिसांनी केले जेरबंद उमरखेड पोलीस स्टेशनची धडक कारवाई.

चोरट्याचा डाव उधळून लावला पोलिसांनी केले जेरबंद.
“उमरखेड पोलीसांची चमकदार कारवाई ; चौघांना केले जेरबंद; आरोपी न्यायालयीन कोठडीत”
उमरखेड,
चोरीच्या प्रयत्नात दबा धरून बसलेल्या चोरट्यांचा डाव उमरखेड पोलीसांच्या पेट्रोलींग पथकाने उधळला .
उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक अमोल राठोड हे आपले कर्तव्य बजावत असताना दि. ३ मे रोजी ‘डायल ११२’ वर पाटील नगर उमरखेड येथून कॉल आला. त्यावेळी आलेला कॉल व्हेरीफाय करून सदर ठिकाणी बिट पेट्रोलींग अंमलदार ना.पो.काँ. संतोष राठोड यांच्यासह होमगार्ड मनिष राठोड यांना बोलावून घेतले. त्यावेळी सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना ३:०० वा. च्या सुमारास आदिवासी मुलांचे वस्तीगृह बोरबन नगर जवळ ‘हिरो पँशन प्रो’ क्र. MH 29 AG 6831 या क्रमांकाची एक मोटार सायकल संदिग्घ ठिकाणी उभी असल्याचे पेट्रोलिंग पथकाच्या लक्षात आले.
त्यावेळी आजूबाजूला पाहणी केली असता वस्तीगृहाच्या आवारात काहीजण चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलीसांनी विचारलेल्या प्रश्नांंची उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देत असल्याने पोलीसांचा संशय अधिकच बळावला.. त्यावेळी पोलीस पथकाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेवून पंचासमक्ष नावे विचारली असता १) प्रविण किशोर जाठ्या वय, २३ रा. सवना ता. महागाव, २) प्रल्हाद राजू भेलके वय, २३ रा. सवना ता. महागाव, ३) शेख ईस्माईल शेख इज्राईल वय, २४ रा. अंबोडा ता. महागाव व ४) विक्की बाळकृष्ण गेडाम वय, २३ रा. बोरबन नगर उमरखेड असे त्यांनी नावे सांगीतली.
याप्रकरणी पो.उ.नि. जयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२१/२०२२ कलम, १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेतलेल्या चौघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पिसाय अमोल राठोड व पो. काँ. नरेंद्र पुंड हे पुढील तपास करित आहे करीत आहेत..