मदनापुर येथील आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज
मदनापूर येथील आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज
श्रीक्षेत्र माहूर – नितीन तोडसम
मदनापुर
मौजे मदनापूर येथे ८५ लक्ष रुपयाच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम सुरु असून सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने मौजे मदनापूर येथील जागरूक नागरिक राजु पुंडलिकराव टनमने, शंकर लांडगे बालाजी टनमने यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड यांच्याकडे सदरील निकृष्ट काम व ५ लक्ष रुपयाच्या निधीतून होत असलेले बंदिस्त नालीच्या निकृष्ट कामाची तक्रार केल्यानंतर मदनापूर गावात सदर तक्रारीवरून राजकारण रंगले आहे.
सोशल मिडीयाच्या काही प्रतिनिधींना हाताशी धरून ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे ते सरपंच, उपसरपंचांनी त्यांच्या राजकीय गड फादरच्या मार्गदर्शनात सदर कामावर चांगल्या प्रकारे क्युरिंग झाल्याची बतावणी केली.
इमारतीचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्याचे सरपंच व उपसरपंच व काही त्यांच्या फेवरच्या नागरिकांच्या तोंडून सोशल मिडीयात वदवून घेत जाहीर केले व स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत तक्रार निकाली निघाल्याचे घोषित करून यामध्ये राजकारण असल्याचा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून कठोर प्रशासक म्हणून ख्यातीप्राप्त जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी मदनापूर गावाला भेट दिऊन सदर आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसह बंदिस्त नालीचे बांधकाम व यापूर्वी झालेल्या इतर कामाना भेटी देऊन पाहणी केल्यास दुध का दुध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु टक्केवारीच्या चक्रव्युहात वरिष्ठ अधिकारीही फसलेले असल्याने निकृष्ट दर्जाचे काम करणारे सोशल मिडिया हाताशी धरून स्वतःच उत्कृष्ट काम होत असल्याचे जाहीर करून घेण्याची हिम्मत करतात अशी चर्चा मदनापुरात रंगू लागली असून खरोखरच सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी होणार का ! याकडे नागरिक लक्ष देऊन आहे.
आम्ही सादर केलेली तक्रार ही जि.प. चे कनिष्ट अभियंता, कंत्राटदार व स्थानिक प्रशासन म्हणून ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे विरुद्ध असल्याने तक्रारीच्या चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्याकडे मांडावयाची बाजू आधीपासूनच सोशल मिडीयाच्या काही लोकांना हाताशी धरून चांगले काम झाल्याचे जाहीर करत निकृष्ट दर्जाचे कामाला पाठिंबा देत कंत्राटदार व अभियंता यांना बचावाचा मार्ग मोकळा करून देत सुटमोकळीक देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सदर कामास मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड यांनी भेट देणे व उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक असून त्याशिवाय तक्रार निकाली निघणार नाही अन्यथा सदर निकृष्ट कामाबाबत आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका दाखल करून मदनापूर करळगाव वासियांना न्याय मिळवून देण्याकरिता मागेपुढे पाहणार नाही अशी प्रतिक्रिया तक्रारदार राजु पुंडलिकराव टनमने, शंकर लांडगे बालाजी टनमने यांनी व्यक्त केली.